तीन पंतप्रधानांचा अजमल खान यांना सहवास लाभला - प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे
तीन पंतप्रधानांचा अजमल खान यांना सहवास लाभला - प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) शेवटच्या श्वासापर्यंत जनता दल सेक्युलरचे नेते दिवंगत अजमल खान यांनी कष्टकरी, कामगार, शेतकरी, दलित, अल्पसंख्याक, आदीवासी मागास समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटले. जेव्हा मंडल आयोगाला व्हि.पी.सिंग पंतप्रधान असताना मान्यता मिळाली देशभरात मंडल विरोधात कमंडल आंदोलन सुरू झाले. ओबीसींना आरक्षण मिळावे. या समाजाने प्रगती करावी अशी तळमळ अजमल खान यांची होती. मंडल आयोगाच्या समर्थनार्थ आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. शेतकऱ्यांवर कष्टकरी वर्गावर अन्याय झाला तर सरकारच्या विरोधात उभे असलेल्या सर्व आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. महाराष्ट्रात सामाजिक व सांस्कृतिक व साहित्य चळवळीत कामात अग्रेसर होते. समाजवादी नेते दिवंगत पंतप्रधान आय.के. गुजराल, दिवंगत व्हि.पि.सिंग, एच.डि.देवेगौडा पंतप्रधान असताना त्यांचा यांच्याशी थेट संपर्क असायचा. तीनही पंतप्रधानांना औरंगाबाद शहरात त्यांनी आमंत्रित करून विविध कार्यक्रम आयोजित केले होते. ते एक समाजवादी व धर्मनिरपेक्ष नेते होते त्यांच्या निधनाने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी मुस्लिम आरक्षणासाठी सुरुवातीला आंदोलनाला सुरुवात केली होती. मालेगावचे दिवंगत आमदार निहाल अहेमद, बापुसाहेब काळदाते व स्वातंत्र्य सेनानी यांच्या सोबत अनेक आंदोलनात सहभाग असायचा. कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा शहरात येणार आहे. शेवटपर्यंत ते जनता दल सेक्युलर पक्षाशी एकनिष्ठ राहिले त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हिच कामना अशा आठवणी गांधीभवन येथे आयोजित शोकसभेत जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी व्यक्त केले.
विविध पक्ष व संघटनांचे नेत्यांनी शोकसभेत उपस्थित राहुन आठवणींना उजाळा दिला. अजमल खान यांना शोकसभेनंतर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती अॅड विष्णू ढोबळे, काॅ.भिमराव बनसोड, अॅड आसाराम लहाने, अण्णा खंदारे, अॅड सुभाष सावंगीकर, प्रा.विष्णू गाडेकर, एस.जी.शुत्तारी, मच्छिंद्र गोर्डे, भिमराव काटकर, रंजित खंदारे, सुभाष गायकवाड, राम जाधव, सुशिलाताई मुरदाडे, शुकुर सालार, मुख्तारभाई, अॅड अभय टाकसाळ, संदीप लहाने, भाऊसाहेब जाधव, अजमल खान यांचे सुपुत्र डॉ.अफजाल खान, आदील खान, इजलाल खान, बिलाल खान, तलत इलाहि खान, नईम हाश्मी उपस्थित होते.
What's Your Reaction?