फुलंब्री तालूका दुष्काळग्रस्त घोषित करुन मदत देण्याची मागणीसाठी काढला मोर्चा
फुलंब्री तालूका दुष्काळग्रस्त घोषित करुन मदत देण्याची मागणीसाठी काढला मोर्चा
औरंगाबाद, दि.9(डि-24 न्यूज) फुलंब्री तालुक्यात कमी पावसामुळे पिके खराब झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पिके खराब झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास निघून गेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जनावरांना चारा पाण्याचे संकट ओढवले आहे. मजूरांच्या हाताला काम नाही. पिण्याच्या पाण्याची आतापासूनच टंचाई निर्माण झाल्याने टँकर सुरू झाली आहे. फुलंब्री तालूका हा दुष्काळग्रस्त जाहीर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी हिमायतबाग चौकापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सरपंच मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळी शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त यांना सादर केले. आपल्या भाषणात सरपंच मंगेश साबळे यांनी सरकारला इशारा दिला आहे की पंधरा दिवसांत तालुका दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांना मदत करावी नसता मुले बाळ, जनावरे घेऊन, बैलगाडीत संसाराच्या वस्तू सोबत आणून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संसार थाटून असा इशारा प्रशासनाला दिला आहे.
यावेळी शेतकरी व महीला वर्गांनी घोषणाबाजी केली.
मोर्चात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
याप्रसंगी नारायण लोखंडे, रोहिदास डकले, सोमिनाथ बेडके, दिपक ढोके आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?