खुलताबाद उर्स, धुळे-सोलापूर महामार्गावर अवजड वाहतूक मार्गात बदल...!
धुळे-सोलापूर महामार्गावर अवजड वाहतुक
मार्गात दि.9 ते 20 दरम्यान बदल
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.3(डि-24 न्यूज) खुलताबाद शहरात जर-जरी-जर बक्ष उर्स व ईद ए मिलाद या सणानिमित्त होणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता दि.9 ते 20 दरम्यान धुळे सोलापूर महामार्गावरील अवजड वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत असे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.
खुलताबाद शहरात दि.9 पासून दि.20 पर्यंत जरजरी बक्ष उर्स तर दि.16 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा सण साजरा होणार आहे. खुलताबाद शहरात यानिमित्त हजरत मोहम्मद पैगंबर यांचे पैरहन मुबारक दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे या कालावधीत धुळे सोलापूर महामार्गावर अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हे बदल दि.9 ते 20 दरम्यान सायंकाळी 6 ते सकाळी 8 यावेळात लागू राहतील,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतुकीतील बदल याप्रमाणे–
फुलंब्री कडून – कन्नड व धुळे कडे जाणारी सर्व जड वाहतूक – ही छत्रपती संभाजीनगर – शरनापूर फाटा – माळीवाडा- वरझडी- कसाबखेडा- देवगाव रंगारी- शिऊर-तलवाडा घाट मार्ग चाळीसगाव – धुळे कडे जाईल.
धुळे – कन्नड कडून येणारी सर्व जड वाहतूक ही तलवाडा घाट- शिऊर- देवगाव रंगारी- कसाबखेडा- वरझडी-माळीवाडा- छत्रपती संभाजीनगर मार्गे फुलंब्री कडे जाईल.
छत्रपती संभाजीनगर खुलताबाद मार्गे चाळीसगाव – धुळे कडे जाणारी जड वाहतूक ही छत्रपती संभाजीनगर – माळीवाडा- कसाबखेडा फाटा- देवगाव रंगारी – शिऊर- तलवाडा घाट मार्गे चाळीसगाव कडे जाईल.
धुळे – चाळीसगाव कडून खुलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी सर्व जड वाहतूक ही तलवाडा घाट शिऊर – देवगाव रंगारी- कसाबखेडा फाटा- वरझडी- माळीवाडा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाईल.
वेरुळ – खुलताबाद कडून फुलंब्री कडे जाणारी वाहतुक ही वेरुळ – कसाबखेडा फाटा- माळीवाडा मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाईल.
What's Your Reaction?