शहरात होणाऱ्या IATO परिषदेने पर्यटन विकासाला मिळेल चालना - पालकमंत्री संदीपान भुमरे

 0
शहरात होणाऱ्या IATO परिषदेने पर्यटन विकासाला मिळेल चालना - पालकमंत्री संदीपान भुमरे

शहरात होणाऱ्या Indian Association of Tour operator (IATO) वार्षिक परिषदेमुळे पर्यटन विकासाला मिळेल चालना- पालकमंत्री संदीपान भुमरे

पर्यटन विकासासाठी भुमरे आणि विरोधीपक्षनेते अंबादास दानवे साथ साथ....

 औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज)

शहरात तीन दिवसीय IATO ANNUAL CONVENTION मुळे शहर व जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी फायदा होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली आहे.

विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी हि परिषद शहरात व्हावी एअर कनेक्टिव्हिटी वाढावी, विदेशी पर्यटकांची संख्या वाढली तर उद्योग वाढतील व रोजगाराचे संधी वाढतील असे सांगितले. 

जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सांगितले जागतिक पर्यटन दिनानिमित्त शहरात हि परिषद होत आहे यामुळे पर्यटन विकासासाठी जिल्ह्यातील उद्योगांना याचा भविष्यात फायदा होईल.

IATO चे अध्यक्ष राजीव मेहरा यांनी परिषदेबाबत महत्वाची माहिती दिली दि. 29 सप्टेंबर 2023 ते 1 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये शहरात 38 व्या IATO वार्षिक परिेषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 IATO वार्षिक परिषद दरवर्षी वेगवेगळया राज्यात आयोजित करण्यात येते. सदर IATO परिेषदेकरिता देशभरातून हजार पेक्षा जास्त Tour operators येत असतात. सदर परिषदे दरम्यान पर्यटन क्षेत्रातील सर्व सहभागीदार यांची B To B बैठका, पर्यटन विषयी संबंधी सादरीकरण तसेच पर्यटन धोरणांबाबत चर्चा होतात. या परिषदेच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन क्षमता, पर्यटन स्थळे, संस्कृती, परंपरा यांची राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी करण्याची सुवर्ण संधी आहे.

 पर्यटन विभाग व IATO यांच्या दरम्यान दि.20 मार्च 2023 रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारान्वये IATO च्या आयोजनाकरिता पर्यटन विभागाद्वारे रु. 1 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रु. 2 कोटी निधी देण्यात आला.

IATO मार्फत राज्याची प्रिंट, डिजिटल तसेच विविध समाज माध्यमाद्वारे प्रसिध्दी करण्यात येणार आहे. IATO च्या आयोजनामुळे महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्थळावर प्रसिध्दी होवून पर्यटकांचा ओघ राज्याकडे आकर्षित करण्यास मदत होणार आहे. पर्यटकांच्या वाढत्या ओघामुळे स्थानिक अर्थव्यवस्था व रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

प्रथमच 2 Tier शहरामध्ये पर्यटनाचा महाकुंभ म्हणजेच (IATO 38th Convention) पर्यटन परिषद

 शहरामध्ये होत आहे.

या जिल्हयामध्ये 2 हजार वर्षांची साक्ष देणारे पर्यटन स्थळ आपल्या जिल्हयामध्ये आहे. IATO Convention नंतर शहरामध्ये मध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढून शहर पर्यटनाच्या मुख्य प्रवाह मध्ये येईल.

 मराठवाडा मुक्ती संग्राम लढयाचे 75 वे वर्ष साजरा करत असताना शहरामध्ये असे पर्यटन परिषद होत असल्याने शहराला विविध पर्यटन स्थळांचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खुप मोठी संधी आहे.

 जिल्हयामध्ये धार्मिक पर्यटन तिर्थक्षेत्र सोबतच किल्ले, जागतिक वारसा स्थळे, दक्षिणेचा ताज म्हणून ओळखला जाणारा बिबी का मकबरा, लेण्या, निर्सगरम्य हिल स्टेशन म्हैसमाळ अशा अनेक रुपानी नटलेल्या जिल्हयाला एक नविन ओळख करुन देण्याची गरज वाटत नाही.

पर्यटन विभागाने पर्यटनाशी निगडीत विविध योजना चालू केल्या आहेत. त्यामध्ये कृषी पर्यटन, बीच शॅक पॉलीसी, कॅराव्हॅन पॉलीसी, साहसी पर्यटन (वायू, हवा व पाणी) व Incentive Policy 2016 प्रमाणे उद्योजकांना त्यामध्ये सवलती देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध टुर पॅकजेस तयार केले आहेत. ते महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. पर्यटन विकास योजने अर्तंगत विविध कामे सुरू आहेत.

 महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे आणि आयटो देशातील बहुतांश परदेशी पर्यटकांसाठी सेवा देणाऱ्या ऑपरेटर्सची संस्था आहे. आमच्या शहरात देशातील पहिले जागतिक (ताज महालच्या पूर्वीच घोषित झालेले) वारसास्थळ आहे. दोन जागतिक, तीन राष्ट्रीय स्मारके या जिल्ह्यात असून, शहरात 145 पेक्षा अधिक वारसास्थळे आहेत.

राजधानीचा दर्जा असूनही येथील पर्यटन व्यवसायाचा कालावधी जो 20 वर्षांपूर्वी 12 बारा महिन्यांपैकी 10 महिने होता तो आज केवळ तीन महिन्यांवर आला आहे. याला परत वरती नेण्यासाठी हे कन्व्हेन्शन आवश्यक होते.

 उदयपूर- औरंगाबाद विमान बंद पडल्याने राजस्थानातून थेट येणारी पर्यटकांची संख्या बंद झाल्याने औरंगाबाद मुख्य आयटरणरीतुन बाहेर गेले आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत की शहराचा हवाई मार्ग पुन्हा उदयपूरशी जोडला जावा. यासाठी आम्हाला 'आयटो ' ची साथ आवश्यक आहे.

 छोट्या शहरांमध्ये आयटोचे कन्व्हेन्शन झाले तर देशातील लपलेले सौंदर्य जगापुढे आणण्यास मदत होईल. हे शहर देशातील 27 वे सर्वाधिक निर्यात करणारे शहर आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या शहराच्या क्षमता दाखण्याची ही संधी आहे. शहरात ऐतिहासिक, औद्योगिक, धार्मिक, पर्यावरणीय अशी अनेक प्रकारची स्थळे असल्याने येथे देशांतर्गत पर्यटन भरपूर आहे. मात्र परदेशी पर्यटन काही कमी असल्याने त्याच्या वृद्धीसाठी आम्हाला ही परिषद आवश्यक होती.

या पर्यटन परिषदेसाठी आवश्यक सर्व यंत्रणा ही शहरातच उभारली गेली आहे. या माध्यमातून आमच्या शहराचे बलस्थान दाखवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.

शिर्डी संस्थान, लोणार, पैठण धरण, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर, शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर सारखी पर्यटनस्थळे शहराशी अगदी सोप्या मार्गाने जोडली गेली आहेत. या ठिकाणांना जाणार पर्यटक शहराला येऊन त्यांचा मुक्काम वाढवा आणि पर्यायाने शहराची पर्यटन अर्थव्यवस्था वाढावी, अशी आमची अपेक्षा आहे. विभागा अंतर्गत 9 पर्यटन निवासे, व 6 उपहारगृहे तसेच वेरुळ अभ्यागत केंद्र, अजिंठा अभ्यागत केंद्र व कलाग्राम इत्यादी आहेत.

महामंडळातील विभागाअंतर्गत 9 टुर पॅकजेस पर्यटकांकरिता उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये 1 दिवसीय, ½ दिवसीय , 3 दिवसीय व 5 दिवसीय टुर उपलब्ध आहेत.

जबाबदार पर्यटन अंतर्गत महामंडळाच्या पर्यटक निवास परिसराच्या मोकळया जागेत वृक्षारोपन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त “वसुधा वंदन” योजने अंतर्गत पर्यटक निवासामध्ये दिर्घकाळ टिकणाऱ्या भारतीय प्रजातीच्य वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

 2023 आंतराराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महामंडळाच्या उपहारगृह येथे तृणधान्यांपासून तयार केलेले अन्न पदार्थ उपलब्ध करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत स्मार्ट सिटी यांचे समवेत औरंगाबाद ते अजिंठा व वेरुळ येथे पर्यटकांकरिता बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.

अजिंठा लेणी येथे इ- वाहन सेवा सुरु करणे बाबत प्रस्तावित आहे.

यावेळी रजनीश खैस्ता, संजय राजदान, जितेंद्र केजरीवाल, रवी गोसैन, सुनील मिश्रा, विनय त्यागी, प्रणब सरकार, जसवंतसिंग व पर्यटन विभागाचे अधिकारी परिषद यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow