सराईत मोटारसायकल चोराकडून 6 महागड्या मोटारसायकल जप्त, वाळूज पोलिसांची कारवाई

सराईत मोटारसायकल चोराकडून 6 महागड्या मोटारसायकल जप्त, वाळूज पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) फिर्यादीच्या तक्रारीवरून त्याची बजाज पल्सर मोटारसायकल MH-20, FE-7432 बाबत पोलिस ठाणे वाळूज येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास वाळूज पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोउपनि अजय शितोळे व गुन्हे शोध पथक करत होते. गुप्त बातमीदार नेमून वाहन चोराची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न केले. गुन्ह्यात चोरी गेलेली पल्सर गाडी सराईत वाहन चोराने चोरली असल्याची माहिती मिळाली. त्याचेवर सतत पाळत ठेवून हालचालिची माहिती घेतली. त्याच्यावर सापळा रचलेला असताना तो लांझी रोड येथे पल्सर गाडी घेऊन आला. त्यास जागीच पकडून पोलिस स्टेशन येथे आणले. त्याच्या ताब्यातून ती गाडी नंबर बदलून चालवत असल्याचे निदर्शनास आले.
दाखल गुन्ह्यात इसम नामे सुरेश भिमा मल्ले, वय 26, राहणार जेऊर ता.नेवासा, जिल्हा अहमदनगर सध्या राहणार वाळूज एमआयडीसी यास गुन्ह्यात अटक करुन तपास केला असता ठाणे शहर येथून गेलेली यामहा कंपनीची R15 हि महागडी गाडी हस्तगत केली. तसेच इतर पाच असे एकूण सहा गाड्या हस्तगत करण्यात आले. त्याच्या चोरी संबंधाने विविध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. नमूद आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तपास करुन अधिक मोटारसायकल मिळण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोउपनि अजय शितोळे करत आहे. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अजय शितोळे, पोअ विजय पिंपळे, सुधाकर पाटील, नितिन धुळे, श्रीकांत सपकाळ, पोलिस मित्र अमन शेख यांनी पार पाडली.
What's Your Reaction?






