फिलिस्तिनच्या समर्थनार्थ एसडीपिआयने केली मुक निदर्शने
फिलिस्तिनच्या समर्थनार्थ एसडीपिआयने केली मुक निदर्शने
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) इज्राईल व फिलिस्तिनचे युद्ध सुरू आहे. या युध्दात दोन्हीकडून लोक मारले जात आहे. यामध्ये महिला व लहान बालकांना जीव गमवावा लागत आहे. फिलिस्तिन आपल्या जमिनीसाठी हा संघर्ष करत आहे. त्यांची हक्काची जागा त्यांना मिळाली पाहिजे व युद्ध न होता मध्यस्थी करुन मार्ग काढावा व फिलिस्तिनला न्याय मिळवून देण्यासाठी जगातील प्रमुख देशांनी पुढाकार घ्यावा यासाठी आज एसडीपिआयने रोशनगेट येथे मुक निदर्शने करुन इज्राईलचा निषेध केला व फिलिस्तिनला पाठिंबा दर्शविला.
यावेळी इज्राईलचे पंतप्रधान यांच्या फोटोला व झेंड्याला कार्यकर्त्यांनी जोडे मारले.
याप्रसंगी एसडीपिआयचे प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम, जिल्हाध्यक्ष मोहसीन खान, नदीम शेख, साकी अहेमद, डॉ.एम.आय.सईद, अबुजर पटेल, महेजबीन बाजी, हसिना कौसर, जुबेर पटेल, अब्दुल अजीम, शेख अलिम, इम्रान पठाण आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?