इम्तियाज जलील यांना कोणी दिला शिंदे गटात येण्याची ऑफर, राजकीय चर्चांना उधाण

 0
इम्तियाज जलील यांना कोणी दिला शिंदे गटात येण्याची ऑफर, राजकीय चर्चांना उधाण

इम्तियाज जलील यांना कोणी दिला शिंदे गटात येण्याची ऑफर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना शिंदे गटात येण्याची ऑफर अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.

त्यांनी पुढे सांगितले आम्ही त्यांना खुर्ची देण्यासाठी तयार आहेत त्यांनी सांगावे आमच्या सोबत यायचे की नाही. 

आमखास मैदानावर भव्य दिव्य फुटबॉल स्टेडियम उभारण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हि ऑफर दिली आहे. आता आमखास मैदानावर जागतिक दर्जाचे क्रिडा संकुल उभारले जाणार आहे म्हणून एमआयएमच्या सभेला हा मैदान मिळणार नाही असेही अब्दुल सत्तार म्हणाले. त्यांनी सभा हैदराबाद येथे घ्यावी असाही टोला लगावला. खासदार इम्तियाज जलील यांनी ऑफर वर काही उत्तर न देता येथे भव्य फुटबॉल व क्रिकेट स्टेडियम बनावे अशी खेळाडूंची इच्छा आहे असे सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow