जालन्यातून डॉ.कल्याण काळे यांना काँग्रेसची उमेदवारी, रावसाहेब दानवेंचा करणार सामना

 0
जालन्यातून डॉ.कल्याण काळे यांना काँग्रेसची उमेदवारी, रावसाहेब दानवेंचा करणार सामना

जालन्यातून डॉ.कल्याण काळे यांना काँग्रेसची उमेदवारी, रावसाहेब दानवेंचा करणार सामना

औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांना जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा या निवडणुकीत ते सामना करणार आहे. तर धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ.शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. डॉ.सुभाष भामरे यांच्या विरोधात हा सामना रंगणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघात मागिल निवडणुकीत विलास औताडे यांनी टक्कर दिली होती. या मतदारसंघातून 1996 पासून सलग काँग्रेसचा पराभव झाला आहे यावेळी महाविकास आघाडी काय रननिती बनवते हे बघावे लागेल. या मतदारसंघातून दोन वेळा भाजपाच्या तिकीटावर उत्तमसिंह पवार निवडून आले होते त्यानंतर रावसाहेब दानवे नेतृत्व करत आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत डॉ.कल्याण काळे यांनी दानवेंपुढे तगडे आव्हान दिले होते. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व काँग्रेस सोबत असल्याने ताकत वाढलेली असल्याने राजकीय समीकरण बदलू शकतात असे राजकीय जाणकारांना वाटते. डॉ.कल्याण काळे हे काँग्रेसचे निष्ठावंत मानले जातात. फुलंब्री व औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदार म्हणून दोनदा निवडणूक जिंकली होती. फुलंब्रीचे आमदार असताना त्यांनी 2009 साली निवडणूक लढली होती. आता ते प्रचाराची रननिती कशी आखतात हे बघावे लागेल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow