पाण्यासाठी गब्बर एक्शन कमेटी एक्शन मोडमध्ये, जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

 0
पाण्यासाठी गब्बर एक्शन कमेटी एक्शन मोडमध्ये, जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

पाण्यासाठी गब्बर एक्शन कमेटी एक्शन मोडमध्ये, जलदगतीने काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन

औरंगाबाद, दि.27(डि-24 न्यूज) शहरासाठी नवीन पाण्याच्या पाईपलाईनसाठी विलंब होत आहे. शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा. संथगतीने काम करत असलेल्या ठेकेदारावर कार्यवाही करावी. सरकारने दररोज पाणी देण्याचे वचन पाळावे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आठ दहा दिवसाआड पाणी मिळत असल्याने गृहीनी त्रस्त झाले आहे. पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही तर क्रांतीचौकातून हजारो लोकांच्या उपस्थितीत हंडा मोर्चा काढण्याचा इशारा गब्बर एक्शन कमेटीने मनपा प्रशासनाला इशारा दिला आहे.

शहरातील विविध वार्डातील नागरी समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी आज सकाळपासून महापालिकेच्या मुख्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन कमेटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी दिव्यांग, शहरातील नागरिक व कमेटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे दिव्यांगांना हक्काचे अनुदान द्यावे व प्रत्येक मनपाच्या उद्यान व व्यापारी संकुलात आरक्षित दुकाने द्यावे. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता ज्या डॉक्टरांनी सेवा दिली त्यांचे थकीत वेतन अदा करुन सेवेत कायम करावे. बीएचएमएस, सी.सी.एम.पी(माॅडर्न फाॅर्मोकोलाॅजी) पूर्ण केलेल्या होमिओपॅथीक डॉक्टरांना सर्व आरोग्य विभाग महापालिका, जिल्हा परिषद, 108 अॅम्बूलन्स सेवा व इतर शासकीय आरोग्य सेवेत इतर आयुष डॉक्टरांप्रमाणे वैद्यकीय सेवा लाभ देण्यात यावे.

वार्ड क्रं.4, येथील सईदा काॅलनी या भागात जलनिस्सारन पॅरालाल पाईपलाईन गल्लोगल्ली ड्रेनिजलाईन टाकण्यात यावी. सध्या मुख्य जलनिस्सारनचे काम सुरू आहे. मनपाच्या निधीतून नवीन रस्ते, स्ट्रीट लाईट त्वरित बसवण्यात यावेत.

नागरीकांना घर टॅक्स वर आकारलेल्या मुळ व्याजात 75 टक्के सुट देण्यात यावे जेणेकरून थकीत टॅक्स भरण्यास नागरीकांचा प्रतिसाद मिळेल. नंदनवन काॅलनी, चांदमारी येथे पाण्याची पाइपलाइन टाकली पण पाणी सुरु केले नाही हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. अशोक चक्र ते कैलास नगर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रोडवर महावितरणचे 12 ते 15 विजेचे खांब रोवण्यात आले आहे. त्यामुळे सदरील ठिकाणी स्मशानभूमीकडे अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी रहदारीस विजेच्या खांबामुळे अत्यंत अडचणी निर्माण होत आहे. विजेचे खांब तात्काळ काढण्यात यावे. हेड पोस्ट ऑफिस जुना बाजार, नुर काॅलनी या भागातील मस्जिदीच्या बाजूला सिमेंटची सांडपाणी वाहण्याची नाली तयार करण्यासाठी वारंवार मनपाला निवेदन दिले. सांडपाण्याची नाली त्वरीत करुन देण्यात यावी या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त सौरभ जोशी यांना शिष्टमंडळाने दिले.

याप्रसंगी गब्बर एक्शन कमेटीचे अध्यक्ष मकसूद अन्सारी, उपाध्यक्ष हाफिज अली, हसन शाह, इम्रान पठाण, जेष्ठ पत्रकार मजहर शेख, शेख साबेर, अलीम बेग, अब्दुल कय्यूम, शेख नासेर, शेख इस्माईल राजा, लतिफ खान, छावणी परिषदेचे माजी सदस्य हनिफ शेख, डॉ.शेख शकील, शेख तय्यब, चंद्रशेखर हिवराळे, नाजनीन बेगम, मथुरा सपकाळ, रवी सौदागर, रुबिना बागवान, लक्ष्मी घुले, नसिर खान, शेख इम्रान, शफीक पठाण, नगिना बी रफीक शहा, गंगुबाई शेजवळ, शकुंतलाबाई त्रिभुवन, नंदा मोहिते, शेख जबीन, रेश्मा खोतकर आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow