उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, भाजपाचा शहरात जल्लोष

 0
उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, भाजपाचा शहरात जल्लोष

उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, भाजपाचा शहरात जल्लोष

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) उद्या मुंबईत देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत हे निश्चित झाल्यानंतर शहरातील भाजपा कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटप करुन आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने लाडक्या बहीणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेष्ठ नागरिक, युवा, महीलांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मते दिल्याने पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणार आहे व जनतेला दिलेल्या वचनपूर्ती करेल अशी प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार शपथ घेतील अशी शक्यता आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow