भोकरदन तालुक्यात गारपीट, वीज पडून दोन जण दगावले, पिकांचे नुकसान

 0
भोकरदन तालुक्यात गारपीट, वीज पडून दोन जण दगावले, पिकांचे नुकसान

भोकरदन तालुक्यात गारपीट, विज पडून दोन जणांना मृत्यू, पिकांचे नुकसान

भोकरदन,दि.26(डि-24 न्यूज) आज मराठवाड्यातील काही ठिकाणी गारपीट झाली आहे. भोकरदन तालुक्यात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले आहे. तर सायंकाळी सिपोरा बाजार व कुंभारी येथे दोन जणांवर विज पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. टेंभुर्णी, जाफराबाद तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला, सिल्लोड तालुक्यातील अंभईत सुध्दा पाऊस पडला तर औरंगाबाद तालुक्यात ढगाळ वातावरण होते.

अचानक अवकाळी पाऊस सुरू झाला वाद वा-यासह वीज कडाडली. कुंभारी येथील विवाहिता सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान पल्लवी विशाल दाभाडे, वय 21, शेतातून घरी येताना विज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला आहे. पश्चात पती व दोन वर्षांचा चिमूकला मुलगा आहे. दुसऱ्या घटनेत सिपोरा बाजार येथील शिवाजी गणपत कड, वय 38, हे सात वाजेच्या दरम्यान शेतात असताना अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. 

या गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow