वंचितचे उमेदवार अंजन साळवे यांनी भव्य रॅली काढून भरला अर्ज
 
                                वंचितचे उमेदवार अंजन साळवे यांनी भव्य रॅली काढून भरला उमेदवारी अर्ज...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.29(डि-24 न्यूज)
शेवटच्या दिवशी औरंगाबाद पश्चिम विधानसभा राखीव मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अंजन भाऊ साळवे तथा विद्यमान औरंगाबाद तालुका अध्यक्ष यांनी आपले नाम निर्देशन पत्र आज भव्य विजय संकल्प रॅली सह दाखल केले. या रॅलीमध्ये सर्व समुदायाचे लोक उपस्थित होते. रॅलीमध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्य प्रवक्ते तय्यब जफर, वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष एड लताताई बामणे, पश्चिम शहराध्यक्ष एड पंकज बनसोडे, औरंगाबाद महिला शहर अध्यक्ष वंदनाताई नरवडे, मनोज वाहुळ, औरंगाबाद जिल्हा महासचिव संघराज धम्मकिर्ती, जिल्हा उपाध्यक्ष पिके दाभाडे, रामेश्वर तायडे, जिल्हा संघटक सुभाष कांबळे, महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मेघानंद जाधव, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रवीण जाधव, रवी रत्नपारखे, एड सागरदास मोरे, पश्चिम तालुका महासचिव शांताराम हिवराळे, कोमल हिवाळे जया, गजभिये, प्रेम बनकर पंडित खैरे,आदिसह हजारो महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            