288 मतदारसंघातून 7995 उमेदवारांचे 10 हजार 905 नामनिर्देशन पत्र दाखल
288 मतदारसंघासाठी राज्यातून आजपर्यंत 7995 उमेदवारांचे 10 हजार 905 नामनिर्देशन पत्र दाखल
मुंबई, दि. 30(डि-24 न्यूज) महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता आज 29 ऑक्टोबर 2024 शेवटच्या दिवशी 7 हजार 995 उमेदवारांचे 10 हजार 905 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाली असून 22 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. 29 ऑक्टोबर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत आलेल्या अर्जांची 30 ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन 4 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.
What's Your Reaction?