वंचित बहुजन आघाडीच्या 51 रक्तदात्यांनी अभिवादन करुन अर्पण केली आदरांजली

 0
वंचित बहुजन आघाडीच्या 51 रक्तदात्यांनी अभिवादन करुन अर्पण केली आदरांजली

वंचित बहुजन आघाडीच्या 51 रक्तदात्यांनी अभिवादन करून आदरांजली केली अर्पण...

औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. आदर्श ब्लड बँक मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम जिल्हा अध्यक्ष योगेश गुलाबराव बन व महासचिव ॲड. पंकज बनसोडे यांनी केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे स्मारक मंडपात उभारून अभिवादन पर रक्तदान शिबिर घेण्यात आले. रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी "ज्या महामानवाने आपल्या पिढ्यानपिढ्या उद्धारासाठी आपल्या रक्ताचे पाणी केले, त्या महामानवाच्या स्मृतिदिनानिमित्त आपण रक्तदान करून आदरांजली अर्पण करूया" अशा पद्धतीने आवाहन करण्यात आले. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जुमडे यांनी स्मारकाला अभिवादन करून रक्तदात्यांना प्रमाणपत्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेली प्रतिमा वाटप केली. औरंगाबाद पश्चिम जिल्हा अध्यक्ष योगेश गुलाबराव बन, महासचिव पंकज बनसोडे, संपर्क प्रमुख गणेश खोतकर, सदस्य प्रवीण पोळ, कोषाध्यक्ष प्रदीप धनेधर, आदी पदाधिकारी यांनी रक्तदान केले. याठिकाणी मराठवाडा सचिव तय्यब जफर, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, शहर अध्यक्ष जलीस अहमद, सचिव सलीम सिद्दीकी यांनी भेट दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow