सिध्दार्थ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
सिद्धार्थ महाविद्यालय पडेगाव येथे बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन....
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) सिद्धार्थ महाविद्यालय पडेगाव येथे बोधिसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले .यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे, महाविद्यालयाचे संचालक, सौरभ मगरे , यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर वानखडे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील निवासस्थानी महापरिनिर्वाण झाले. आणि त्यानंतर बाबासाहेबांचे पार्थिव विमानाने मुंबईला राजगृहावर दादर येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले .आणि दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या स्मशानभूमीमध्ये लाखो अनुयायांसमोर बाबासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण भारतातून आंबेडकर अनुयायी मुंबईच्या दिशेने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमा झाले होते आणि अक्षरशा रडत होते अशा या महामानवाला दहा लाख लोकांसमोर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या समुद्रकिनारी असलेल्या ठिकाणी काही वर्षानंतर बाबासाहेबांच्या अस्थी ठेवून त्या ठिकाणी चैत्य उभारण्यात आले . म्हणून आता या ठिकाणाला पवित्र चैत्यभूमी म्हणून ओळखल्या जाते .आजच्या दिवशी आपण सर्व अनुयायांनी बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करून, त्यांचा अवलंब करून, त्यांचे विचार इतरां पर्यंत पोहोचवणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरू शकते.बाबासाहेबांसारखा दुसरा या जगामध्ये होणे अशक्य आहे. बाबासाहेबांनी महिलांसाठी त्यांच्या हक्कांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर कायदे निर्माण केले आहे. अशा प्रकारे बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरू शकते
यावेळी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते .राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे डॉ विनोद अंभोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि असित शेगावकर यांनी सर्वांचे आभार मानले तसेच ,प्रा. सुरज पर्घमोर , प्रा .पूनम गोबाडे ,मोईन तडवी ,श्रीकांत पातोडे, सुजाता अवचरमल आदी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?