रेल्वेत अनधिकृत विक्री करणाऱ्या हाॅकर्सवर कार्यवाई...
नांदेड विभागात प्रवासी सुरक्षेसाठी रेल्वे गाड्यांमध्ये व स्थानकांवर अनधिकृत विक्रीविरुद्ध विशेष मोहीम...
नांदेड, दि.14(डि-24 न्यूज)-
नांदेड विभागात रेल्वे गाड्यांमध्ये तसेच विभागातील सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांवर अनधिकृत फेरीवाल्यांना आळा घालण्यासाठी विशेष तपास मोहीम हाती घेण्यात आली आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रवासी सुरक्षा वाढवणे, गुणवत्तापूर्ण सेवा सुनिश्चित करणे आणि सुरक्षित व स्वच्छ प्रवास वातावरण निर्माण करणे हा आहे. सध्या सुरू असलेली कारवाई रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त पथकांद्वारे नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालऩा, छत्रपती संभाजीनगर, बसमत, हिंगोली, वाशीम, गंगाखेड इत्यादी प्रमुख स्थानकांवर तसेच विभागातील रेल्वे गाड्यांमध्ये तपासणी करण्यात येत आहे. वैध परवाना नसताना वस्तू विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जात आहे.
मोहीमेची वैशिष्ट्ये
अनधिकृत फेरीविक्री व वस्तुविक्रीवर आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना.
प्लॅटफॉर्म, सर्क्युलेटिंग एरिया तसेच कोचेसमध्ये नियमित तपासणी.
रेल्वे कायदा, 1989 नुसार अनधिकृत विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई.
अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करण्याबाबत प्रवाश्यांमध्ये जनजागृती मोहीम.
महत्वाची सूचना :
रेल्वे प्रशासनाने परवाना दिल्याशिवाय कोणीही व्यक्ती रेल्वे स्थानकावर किंवा गाड्यांमध्ये वस्तूंची फेरी किंवा विक्री केल्यास, रेल्वे कायदा 1989 च्या कलम 144(1) नुसार — त्यास एक वर्षापर्यंत कारावास, किंवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड, किंवा दोन्ही शिक्षांचा सामना करावा लागू शकतो.
प्रवाशांना आवाहन :
भारतीय रेल्वे सर्व प्रवाशांना विनंती करते की फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ व इतर वस्तू खरेदी करा. अनधिकृत विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ रेल्वे हेल्पलाईन : 139 किंवा जवळच्या स्थानक अधिकाऱ्यांना कळवा.
नांदेड विभाग प्रत्येक प्रवाशाला सुरक्षित, स्वच्छ, आरोग्यदायी आणि आनंददायी प्रवास अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहे.
What's Your Reaction?