उन्हाचा तडाखा पाहता नागरीकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नये, घरबसल्या निकालाची माहिती मिळेल - जिल्हाधिकारी

 0
उन्हाचा तडाखा पाहता नागरीकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नये, घरबसल्या निकालाची माहिती मिळेल - जिल्हाधिकारी

उन्हाचा तडाखा पाहता नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नये;

घरबसल्या निकालाची माहिती मिळेल-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...

 औरंगाबाद,दि.2(डि-24 न्यूज) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मंगळवार दि.४ रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. निकालाची उत्सूकता सगळ्यांनाच असते, त्यासाठी लोक मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करतात. मात्र यंदा उन्हाचा तडाखा व तापमान अधिक असण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करु नये. त्यांना निकालाची फेरीनिहाय माहिती घरबसल्या ऐकता येईल यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केली आहे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, मतमोजणी होत असतांना नागरिकांना प्रत्येक फेरीनिहाय निकाल ऐकण्याची उत्सूकता असते. त्यासाठी नागरिक मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करतात. मात्र यंदा उन्हाळा व वाढते तापमान पाहता नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नये. निकालाची माहिती देण्यासाठी विविध वृत्त वाहिन्या, जिल्हा प्रशासनाचे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्स, स्थानिक केबल वाहिन्या यांच्याद्वारे व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांना घरबसल्या निकालाची माहिती मिळेल. तरी नागरिकांनी उन्हाळ्याची परिस्थिती पाहता मतमोजणी केंद्रावर गर्दी करु नये,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow