4 जून रोजी बीड बायपास रस्ता जड वाहनांसाठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करावा- वाहतूक पोलीस
4 जून रोजी बीड बायपास रस्ता जड वाहनांसाठी बंद, पर्यायी मार्गाचा वापर करावा- वाहतूक पोलीस
औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) 4 जून 2024 रोजी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी एमआयटी, फुड एण्ड टेक्नॉलॉजी, बीड बायपास रोड येथे होणार आहे. या रस्त्यावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मतमोजणी प्रक्रीय होत असल्याने वाहनांच्या वर्दळीने नागरीकांच्या सुरक्षितत व जिवीतास धोका किंवा गैरसोय होऊ नये यासाठी 4 जून पहाटे 5 वाजेपासून मतमोजणी संपेपर्यंत सर्व प्रकारचे जड वाहनांची वाहतूक झाल्टा फाटा ते बीड बायपास रोडने महानुभव चौक पर्यंत बंद असणार आहे. पर्यायी मार्ग सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर बंदोबस्त प्रभारी अधिकारी हे आवश्यकतेनुसार वळवतील अथवा मार्गात बदल करतील. अशी अधिसूचना पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. या अधिसूचनेचा भंग करणारी व्यक्ती मो.वा.कायदा, म.पो.कायदा कलम 131 व अन्य फौजदारी कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त वाहतूक सुभाष भुजंग यांनी डि-24 न्यूजला दिली आहे.
What's Your Reaction?