खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर आंदोलन, नामांतर रोखण्यासाठी काय केले विचारला प्रश्न

 0
खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर आंदोलन, नामांतर रोखण्यासाठी काय केले विचारला प्रश्न

खासदार इम्तियाज जलील यांच्या घराला घेराव, नामांतर रोखण्यासाठी काय केले विचारला प्रश्न

औरंगाबाद, दि.2(डि-24 न्यूज) लोकसभा निकालाच्या दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याचे नामांतराला बाबत आवाज उठवला नाही म्हणून खासदार इम्तियाज जलील यांच्या घरासमोर लोक विकास परिषदेने घरासमोर आंदोलन केल्याने खळबळ उडाली. औरंगाबाद शहराचे व जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगराला मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.सरकारने निर्णय घेतला तेव्हा खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतर रोखण्यासाठी काय केले हा प्रश्न विचारण्यासाठी पाच वाजता लोक विकास परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल वाहेद यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी खासदार इम्तियाज जलील यांची भेट झाली नाही. काही काळ येथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अब्दुल वाहेद यांनी यावेळी माध्यमांना सांगितले की ऐतिहासिक औरंगाबाद नावात आमच्या भावना जुळलेले आहे. हे जुने नाव आमच्या शहराची ओळख आहे. नामांतराचा केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्यावेळी नोटीफीकेशन काढले संसदेत खासदारांनी आवाज उठवला नाही तर आक्षेप पण घेतला नाही. न्यायालयात पण दाद मागितली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण केले त्यानंतर काही प्रयत्न केले नसल्याने राग आहे. आज त्यांची भेट झाली नाही काही दिवसांनंतर पुन्हा येऊन त्यांना प्रश्न विचारणार. 4 जून नंतर निकाल चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने लागला तरी त्यांच्या घरासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

निकालाच्या दोन दिवस अगोदर लोक विकास परिषदेने हे आंदोलन केले. आंदोलकांनी शांततेत आंदोलन करत घरी परतले.

 बॅ.असदोद्दीन ओवेसी व इम्तियाज जलील उच्च शिक्षित आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका टाकावी व न्याय मिळवून द्यावा. मी उच्च न्यायालयात याचिका टाकली होती पण ती याचिका फेटाळली गेली होती. असे निवेदनात म्हटले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow