सिटी चौक पोलिसांनी पकडले पिस्टल व अंमली पदार्थ आणि जीवंत काडतूस...
सिटीचौक पोलिसांनी पकडले गावठी पिस्टल व अंमली पदार्थ...!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)- सिटी चौक पोलिसांनी फाजलपूरा येथे कपसिरप बाॅटल बेकायदेशीर विक्री करण्याकरिता जवळ बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी व त्यांच्या टीमने छापा टाकला असता तीन आरोपींकडून एक अग्णिस्त्र(गावठी पिस्टल, दोन जिवंत राऊंड, दोन चाकू, कफ सिरपच्या नशेसाठी वापरात येणाऱ्या बाटल्या जप्त केल्या. मेट्रो हाॅटेल मधून इरफान उर्फ दानिश खान, वय 24, राहणार बायजीपुरा, छत्रपती संभाजीनगर, शेख शाहरुख शेख इरफान, वय 28, राहणार यासिन नगर, हर्सुल, शेख एजाज इब्राहीम, वय 35, व्यवसाय प्लाॅटींग, राहणार नारेगाव यांना ताब्यात घेतले आहे.
यांच्या ताब्यातून 2880 रुपये किंमतीचा कफ सिरपच्या 16 सिलबंद बाॅटल, 200 रुपये किंमतीचा एक लाकडी मुठिचा चाकू, 200 रुपये किंमतीचा एक स्टिलचा चाकू, 5 हजार रुपये किंमतीचा एक स्टिलचा अग्णिशस्त्र(गावठी पिस्टल), 400 रुपये किंमतीचे दोन जीवंत काडतूस, 15000 रुपये किंमतीची DIO DLX होंडा कंपनीची स्कुटी असा एकूण 23980 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी यांनी दिली.
सदरील कामगिरी पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, सहायक आयुक्त शहर विभाग सागर देशमुख, पोलिस निरीक्षक श्रीमती निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे, सफौ पठाण, शेख, पोह बहुरे, गोरे, शाहेद, घोडके, निलावाड, भिंगारे, दवंडे, टेकले, जाधव, पोअं गायकवाड, त्रिभुवन यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दगडखैर करत आहे.
What's Your Reaction?