बालदिनानिमित्त मनपाला CIO च्या बालकांचे निवेदन...

 0
बालदिनानिमित्त मनपाला CIO च्या बालकांचे निवेदन...

बालदिनानिमित्त मनपाला CIO चे निवेदन...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) -14 नोव्हेंबर रोजी बालदिनाच्या निमित्ताने चिल्डर्न इस्लामिक ऑर्गनाईझेशन (CIO) औरंगाबाद तर्फे शहरातील विविध बालविषयक समस्यांबाबत मनपा प्रशासनास एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की मनपाच्या मोकळ्या जागांवर स्वच्छ बागा व मुलांसाठी खेळाचे मैदान तयार करून खेळण्याची साधने उपलब्ध करून द्यावीत. तसेच अशा मोकळ्या जागांवर अनेक गुन्हेगार नशा करतात, त्यामुळे या जागांभोवती कंपाउंड वॉल बांधून झाडे लावून त्यांना उद्यानाच्या स्वरूपात विकसित करावे. विशेषतः कट कट गेट एस.टी. कॉलनीतील समोसा ग्राउंड व विनर इंग्लिश हायस्कूलसमोरची मोकळी जागा उद्यानात रूपांतरित करण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय, शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, जेणेकरून मुलांमध्ये आणि पालकांमध्ये निर्माण झालेली भीतीची भावना दूर होईल. या समस्येचा निपटारा असा करावा की मुलांचे संरक्षणही सुनिश्चित व्हावे आणि जनावरांच्या हक्कांचाही आदर राखला जावा. तसेच जाफर गेट परिसरात मृत्यूमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबाला शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच शिक्षा अधिकार कायद्याची पूर्ण व प्रभावी अंमलबजावणी व्हावी, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी मिळावी, असेही नमूद करण्यात आले.

या शिष्टमंडळात सीआयओच्या मकसूद कॉलनी, रेल्वे स्टेशन, समता नगर, सेंट्रल नाका, टाइम्स कॉलनी, मिल कॉर्नर व इतर युनिट्समधील अनेक मुले सहभागी झाली होती. यात गुला मुस्तफा पठाण, नसीरा खान, अल्फिया शेख, दानियाल, झैनब, खंसा, हानिया, शववाफ, अर्सलान काजी, तैयमियाह, मूसा काजी आदींचा समावेश होता. मुलांचे मेंटर्स आदिल मदनी, नाझिया तौसीफुल्लाह, इसरा मेराज ज़ैद, मसीरा इरफान खान, सुलताना खान, अरफाना, उजमा तौसीफ, लैका अंजुम आणि नाझमा बेगम हे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow