बालदिन साजरा, लहान मुला मुलींच्या भावना समजून घ्या - रामुकाका शेळके

 0
बालदिन साजरा,  लहान मुला मुलींच्या भावना समजून घ्या -  रामुकाका शेळके

लहान मुला-मुलींच्या भावना समजून घ्या...

भाजप अध्यात्मिक आघाडीचे संयोजक रामरावकाका शेळके यांचे आवाहन...

आडगाव येथील मल्हारराव होळकर प्राथमिक आश्रम शाळेत बालदिन साजरा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 14(डि-24 न्यूज)-: "लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" संत तुकारामांच्या या अभंग ओळीप्रमाणे प्रत्येकजण आपले बालपण लहान मुला-मुलींमध्ये शोधत असतो. जी निरागसता त्यांच्यामध्ये असते ती तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही. त्यामुळे संस्कारशील आणि अध्याआत्माचे संस्कार असलेली पीढी घडविण्यासाठी लहान मुला-मुलींच्या भावना समजून घ्या असे आवाहन भाजप अध्यात्मिक आघाडीचे मराठवाडा संयोजक रामराव (काका ) शेळके यांनी केले. आडगाव बुद्रुक येथील मल्हारराव होळकर प्राथमिक आश्रम शाळा येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आयोजित "राष्ट्रीय बालदिन" कार्यक्रमाप्रसंगी ते शुक्रवारी (दि. 14) बोलत होते. 

या कार्यक्रमाप्रसंगी हरिश्चंद्र घुगे, दगडू वाघमोडे, विजय नागरे, बाबुकाका दसपुते, संजय शिंदे, कैलास ढाकणे, रामलाल शिंदे, बळीराम गावंडे, अजिंक्य मदगे, सतीश वाघ, संस्थेच्या अध्यक्षा ताराबाई खटके, मुख्याध्यापक चंद्रकांत देसले, यांच्यासह शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow