मशालची आग विझवण्यासाठी एकजूट दाखवा- बॅ.असदोद्दीन ओवेसी
मशालची आग विझवण्यासाठी एकजूट दाखवा- बॅ.असदोद्दीन ओवेसी
खैरेंचे नाव न घेता टिका... म्हणाले त्यांची शेवटची निवडणूक हि नाही तर 2019 ची होती...
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) खान आणि बाणवर चारदा निवडणूक जिंकूनही मतदार संघाचा विकास केला नाही. नाव न घेता चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. हिंदूत्वाचे राजकारण करत सत्ता उपभोगली द्वेषाचे राजकारण केले आता त्यांच्याकडे बाण सुध्दा नाही मशाल आहे तीहि आग लावणारी हि आग विझवण्यासाठी 2019 सारखी एकजूट दाखवून पुन्हा इम्तियाज जलील यांना विक्रमी मतांनी विजयी करत संसदेत पाठवा असे आवाहन शहागंज येथील जाहीर सभेत एमआयएमचे सुप्रीमो असदोद्दीन ओवेसी यांनी मतदारांना केले आहे.
माझे निधन झाले तर तुमच्या खांद्यावर जाण्याची इच्छा आहे. याच शहरात माझा दफनविधी करावे असे भावनिक आवाहन करत त्यांनी इम्तियाज जलील यांच्यासाठी मते मागितली. जे उमेदवार विरोधात उभे आहेत ते समान नागरी कायदा, सिएए, एनआरसी, एनपिआरला विरोध करतील का...असा प्रश्न त्यांना विचारा. आपले बहुमुल्य मत इम्तियाज जलील यांना का द्यायचे त्यांनी पाच वर्षांत काय काम केले त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
इलेक्ट्रोल बाॅण्ड वर भाजपा वर त्यांनी टिका केली. ज्या ज्या वेळी मुस्लिम विरोधी कायदे बनवले आम्ही त्या विरोधात संसदेत आवाज उठवला काँग्रेसही यावेळी गप्प राहिली. बेरोजगारी वाढत असताना मोदी सरकारवर त्यांनी टिका केली. मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला कोंडीत पकडले याबद्दल त्यांनी जरांगेंची स्तुती केली. यावेळी आपल्या भाषणात अकोला येथून प्रकाश आंबेडकर व अमरावती येथून आनंदराज आंबेडकर यांना जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली. एमआयएमचे कार्यकर्ते दोन्ही नेत्यांच्या विजयासाठी प्रचारात उतरतील असे सांगितले.
शहागंज येथील निजामोद्दीन चौकात रात्री झालेल्या जाहीर सभेत खासदार इम्तियाज जलील, मौलाना महेफुजुर्रहमान, जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, मा.नगरसेवक अयूब जहागिरदार, मा.नगरसेवक नासेर सिद्दीकी, जमीर अहेमद कादरी, आरेफ हुसेनी, फेरोज खान, फातेमा फिरदौस रमजानी खान आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी व हाफिज असरार यांनी केले. यावेळी मोठ्या हारने ओवेसी यांचा सत्कार करण्यात आला.
What's Your Reaction?