माॅब्लिंचिंग, बुलडोझर पोलिटिक्स विरोधात एसडिपिआय अक्रामक, केले विरोध प्रदर्शन
माॅब्लिंचिग, बुलडोझर पोलिटिक्स विरोधात एसडिपिआय अक्रामक
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.12(डि-24 न्यूज) देशातील काही राज्यांत मुस्लिम व दलित समाजातील व्यक्तीला गाठून माॅब्लिंचिग करुन ठार मारले जात आहे. एनडिएचे सरकार देशात तिस-यांदा सत्तेवर आल्यापासून अल्पसंख्याक समाजावर हल्ले वाढले असताना काँग्रेस, समाजवादी व विरोधी पक्षातील नेते काही बोलायला तयार नाही. बुलडोझर पोलिटिक्स सध्या काही राज्यांत सुरू झाली आहे काही दोष नसताना मुस्लिम अल्पसंख्याक गरीबांची घरे बुलडोझर चालवून पाडली जात आहे. कायदा हे सांगत नाही. कायद्याचे उल्लंघन करून माॅब्लिंचिग व बुलडोझर पोलिटिक्स विरोधात एसडिपिआय देशभरात रस्त्यावर उतरून या घटना रोखाव्यात नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एसडिपिआयने रोशनगेट येथे झालेल्या राष्ट्रव्यापी विरोध आंदोलनात दिला आहे.
दुपारी तीन वाजता रोशन गेट येथे प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर घेऊन पक्षाचे झेंडे घेऊन सरकारचा निषेध केला व विरोधात नारेबाजी केली.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष सय्यद कलिम, एसडिपाआयचे नेते अशोक जाधव, जिल्हाध्यक्ष सकी अहेमद, जनरल सेक्रेटरी नदीम शेख, सेक्रेटरी एम.ए.सईद, कोषाध्यक्ष हाफिज अबुजर पटेल, जबीन शेख, समीर शाह आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?