मुस्लिम समाजाला विधानसभेत 13 टक्के वाटा देण्याची मागणी...!

मुस्लिम समाजाला विधानसभेत 13 टक्के वाटा देण्याची मागणी
"जिसकी जितनी संख्या भारी उतनी सत्ता मे भागिदारी" यानुसार विधानसभा निवडणुकीत लोकसंख्येच्या नुसार 13 टक्के उमेदवार महाविकास आघाडीने द्यावे अशी मागणी पत्रकार परिषदेत शेख खुर्रम अब्दुल रशीद यांनी केली आहे....
छ.संभाजीनगर(औरंगाबाद), दि.12(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणुकीत सेक्युलर पक्षांनी राज्यातील 48 जागे पैकी एकही उमेदवार मुस्लिम अल्पसंख्याक दिला नाही तरीही मोठे मन करुन या समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मते दिली यामुळे काँग्रेसला 13, शिवसेना उध्दव ठाकरे 9, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाचे 8 खासदार निवडून आले. विधानपरिषद निवडणुकीत सुध्दा या पक्षांनी एकही उमेदवार मुस्लिम अल्पसंख्याक दिला नाही. मराठवाड्यात आठ पैकी सात लोकसभा सदस्य महाविकास आघाडीचे निवडून दिले. आगामी विधानसभा निवडणुकीत 288 पैकी राज्यात या समाजाची 13 टक्के लोकसंख्या आहे त्यानुसार 39 जागेवर उमेदवार मुस्लिम देण्यात यावे अथवा प्रत्येक जिल्ह्यात एक मतदारसंघातून एक उमेदवार द्यावे त्यांना निवडून देण्यासाठी जनजागृती करुन प्रचारात ताकत झोकून निवडून आणू. मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे ज्वलंत प्रश्न उपस्थित करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य विधानसभेत जावे अशी प्रामाणिक भुमिका समाजाची आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत शेख खुर्रम अब्दुल रशीद यांनी दिली आहे.
यावेळी के.ई.हरदास, सुभेदार सुखदेव बन, भाऊसाहेब पठाडे, अब्दुल वकील शेख, निजाम खान उपस्थित होते.
What's Your Reaction?






