कर्तव्य बजावताना समाजसेवाही करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
कर्तव्य बजावताना समाजसेवाही करा - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महसूल दिन कार्यक्रम

कर्तव्य बजावतांना समाजसेवाही करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज)- महसूल विभागाचा संपर्क हा समाजातील सर्व घटकांशी येतोच. जीवनाचा असा एकही भाग नाही की जो महसूल विभागाशी संबंधित नसतो. त्यामुळे महसूल विभागाचे कर्मचारी म्हणून आपण सर्व समाजघटकांशी विनम्रतेने वागले पाहिजे. महसूल कर्मचाऱ्यांनी नोकरीचे कर्तव्य बजावत असतांना सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन समाजसेवाही करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

 छत्रपती संभाजीनगर उपविभागामार्फत महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसिलदार कैलास वाघमारे, अपर तहसिलदार डॉ. परेश चौधरी आदी उपस्थित होते.

उत्कृष्ट अधिकारी- कर्मचाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नायब तहसिलदार सतीश भदाणे, मंडळ अधिकारी कल्याण वानखरे, सहा. महसूल अधिकारी श्रीधर दांडगे, ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल शेळके, महसूल सहायक श्रीमती शोभा टाक, वाहन चालक एम.एम. शेख, शिपाई समीर शेख, महसूल सेवक अण्णा जाधव या कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सर्व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कार्य करुन जनतेस सेवा द्यावी. आपले कर्तव्य हे जनतेला सेवा देणे हे असून ही सेवा विनम्रतेने दिली जावी. अद्यावत तंत्रज्ञानाचा अंगिकार करुन सेवेचा दर्जा उंचवावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांनीही कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

प्रास्ताविक डॉ. व्यंकट राठोड यांनी केले. रघुनाथ शेळके यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow