वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट
वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट...
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी आज वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट दिली.
प्रधान सचिव वैद्यकीय व औषधी द्रव्ये विभाग डी.टी.वाघमारे त्यांचे समवेत उपस्थित होते. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड, अभ्यागत समिती सदस्य इक्बालसिंग गिल,नारायण कानकाटे, मोहसीन अहमद, प्रविण शिंदे, डॉ.सुधीर चौधरी, विशेष कार्यअधिकारी अतिविशेषोपचार डॉ.गणेश् सपकाळ,सिव्हीटीएस सर्जन उपअधिष्ठाता डॉ.भारत सोनवणे उपस्थित होते.
भेटी दरम्यान रुग्णालय परिसरात असणाऱ्या अतिविशेषोपचार रुग्णालय येथे नव्याने स्थापित झालेल्या कॅथलॅबचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसनजी मुश्रीफ यांनी उद्घाटन केले. या कॅथलॅबचा उद्घाटनाने हदयरोग संबंधित ॲन्जीओप्लॉस्टी आणि ऑन्जीओग्रॉफी च्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
कोविड काळातील वाढती ऑक्सीजनची मागणी लक्षात घेता जिल्हा नियोजन मधून 40 केएल ऑक्सिजन टँकची उभारणी करण्यात आली. याटँकद्वारे 500 ऑक्सिजन बेडसाठी ऑक्सिजन पूर्तता करता येते. दररोज 4 ते5 केएल लिक्विड ऑक्सिजनचा वापर ह्या टँक मधून होतो. लिक्वीड ऑक्सिजन टँकमूळे रुग्णांना उच्च प्रतिचा, सतत अखंडीत ऑक्सिजन पुरवठा करणे शक्य होते.
रुग्णालय परिसरातील मध्यवर्ती ग्रंथालयतील सभागृहात मंत्री महोदयानी महाविद्यालय व रुग्णालय कामकाज आढावा बैठक घेतली. आढावा बैठकी दरम्यान अधिष्ठाता डॉ.संजय राठोड यांनी संसथेतील विविध सोयीसुविधा, शैक्षणिक कामगिरी, रुग्णसेवेती कामगिरी तसेच संस्थेत भविष्यात आवश्यक असणाऱ्या विविध बाबीविषयी प्रेझेटेशनद्वारे यांनी सादरीकरण केले.
यावेळी मंत्री महोदयांनी मार्गदर्शन केले. गरीबांसाठी शासकीय रुग्णालय किती महत्वाची असतात. गरीब रुग्णांना उपचार मिळणेसाठी खासगी रुग्णालयातील धर्मादाय कायद्यान्वये केलेले काम याविषयी सर्वांना अवगत करुन दिले, गरीब रुग्णांसोबत सौजन्याने वागा त्यांच्याशी प्रेमाने बोला त्यामुळे त्यांचा आजार बरा होण्यास मदत होत असल्याचा सल्ला मंत्री महादेयांनी दिला.
हिंगोली येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली आहे. शेवटी गरीब रुग्णांना प्रामिणकपणे योग्य चांगला उपचार व्हावा असे उपस्थित सर्व डॉक्टरर्सना आवाहन केले.
What's Your Reaction?