जटवाडा रोड वरील अतिक्रमण मनपा प्रशासनाने केले जमीनदोस्त

 0
जटवाडा रोड वरील अतिक्रमण मनपा प्रशासनाने केले जमीनदोस्त

विंचेस्टर शाळेचे अनधिकृत रस्ता बाधित अतिक्रमण जमीनदोस्त

जटवाडा रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित

औरंगाबाद, दि.7(डि-24 न्यूज) महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागा मार्फत जटवाडा रोड येथील सारा वैभव समोरील सीबीएससी विंचेस्टर इंग्रजी शाळेच्या संस्था चालकांनी सत्तर बाय दहा व दहा बाय पंधरा या आकाराच्या जागेत रस्त्यावर सिमेंटचे पोलवर लोखंडी जाळी लावून रस्त्यावर अतिक्रमण केले होते. या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. सदर अतिक्रमण बाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी स्थळ पाहणी करून संबंधित संस्थाचालक अफसर नवाब खान यांना सदर अतिक्रमण काढून घेण्याबाबत तोंडी विनंती केली होती. परंतु सबंधित संस्थाचालकानी माझ्याकडे परवानगी आहे व ही माझी जागा आहे या भाषेत ते महापालिकेशी बोलत होते त्यानुसार त्यांना महानगरपालिका अधिनियम 260 अन्वये नोटीस दिली होती. सदर नोटीस चा खुलासा समाधानकारक नसल्यामुळे पुन्हा त्यांना स्वतः अतिक्रमण काढून घेणे बाबत विनंती करण्यात आली होती. सदर अतिक्रमण दहा बाय सत्तर फूट या आकाराच्या जागेवर होते महानगरपालिकेच्या वतीने सदर अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने आज सकाळी साडेदहा वाजता निष्कासित करण्यात आले व परिसर स्वच्छ करण्यात आला. यानंतर याच रस्त्यावर एकूण वीस अनधिकृत रस्त्यावर बांधण्यात आलेले शेड व 12 रस्त्यावर निर्माण केलेले मटन चिकन ची दुकाने यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.सदर दुकाने विनापरवाना होती त्याशिवाय या लोकांनी रस्त्यावर दहा बाय पंधरा दहा बाय दहा असे शेड मारून समोर कोंबडी बकरी आदी जनावरे बांधण्यासाठी पिंजरा करून रस्ता अडवला होता. तसेच दर्शनी भागात मास मटन विक्री करत असल्याने सामान्य नागरिकांना याचा त्रास जाणवत होता. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याशिवाय याच व्यापाऱ्यांनी हर्सूल जेल ते जटवाडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी टपऱ्या टाकून इथेही इतर व्यवसाय सुरू केले होते जे की पूर्णपणे रस्त्यावर असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन अपघात होत होते. याबाबत प्रशासक यांनी यापूर्वीच या भागात पाहणी केली होती व त्याच वेळी कारवाई करणे बाबत निर्देश दिले असता यांना वेळोवेळी समजावून सांगून तरीदेखील हे मानत नव्हते म्हणून आज जेसीबीच्या साह्याने हे सर्व शेड काढण्यात आले. जेल रोड वर लावण्यात आलेल्या नाश्त्याच्या दोन गाड्या जप्त करून पाच लोकांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

 यानंतर याच पथकाने जीएसटी कार्यालयालगत असलेल्या फळ विक्रेत्यां विरुद्ध कारवाई करून त्यांचे किरकोळ स्वरूपाचे साहित्य जप्त करण्यात आले. आजची सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांचे मार्गदर्शनाखाली उपायुक्त अतिक्रमण विभाग प्रमुख सविता सोनवणे यांच्या उपस्थितीत पदनिर्देशित अधिकारी अशोक गिरी, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, प्राणी संग्रहालयाचे डॉक्टर शाहिद व त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती अतिक्रमण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow