मेडीकल कॉलेज परवानगीसाठी बोगस रुग्णालय, आमदार गोरंट्याल यांचा गंभीर आरोप
मेडीकल कॉलेज परवानगीसाठी बोगस रुग्णालय, आमदार गोरंट्याल यांचा गंभीर आरोप
अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर पत्रकार परिषदेत केला आरोप, रुग्णालयाचे बांधकाम हडप केलेल्या प्लाॅटवर सुरू, चौकशीची मागणी...
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) खाजगी मेडीकल कॉलेज स्थापन करण्यासाठी रुग्णांच्या सेवेत रुग्णालय सुरू असावे असे नियम मेडीकल कौन्सिलचे असताना सिल्लोड येथे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संस्थेने बोगस रुग्णालय दाखवून काॅलेजची परवानगी घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत मेडीकल कौन्सिलकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी समाजसेवक महेश शंकरपल्ली, राष्ट्रवादीचे शफीक शेख, गजानन गोराडे उपस्थित होते.
शंकरपल्ली यांनी आरोप लावला आहे की मंत्री अब्दुल सत्तार यांची शैक्षणिक संस्था नॅशनल एज्युकेशन सोसायटी, सिल्लोड अंतर्गत सिल्लोड शहरात नॅशनल आयुर्वेदिक व नॅशनल मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलची(एलओपॅथइक) नोंदनी करण्यात आली आहे. दोन्ही हाॅस्पीटलचे शहरात कोठेही अस्तित्वात नाही. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.एम.मोतीपवळे यांनी 3 एप्रिल 2023 रोजी 300 खाटाचे हाॅस्पीटलची परवानगी दिली आहे. सन 2018 पासून कागदोपत्री दोन हाॅस्पीटल चालू असल्याचे दाखवून आरोग्य विभागाची व शासनाची सर्रास फसवणूक करुन लोकांच्या आरोग्य व जीवितास यांनी बाजार मांडून खेळ चालवला आहे. त्यांच्या संस्थेमार्फत मेडीकल कॉलेजची परवानगी घेण्यासाठी नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप केला आहे. ज्या ठिकाणी हाॅस्पीटलचे बांधकाम सुरू आहे त्यामध्ये अनेक लोकांनी खरेदी केलेली प्लाॅट हडप केलेले आहे. शिवसेना भवन ज्या ठिकाणी उभारले ती जमीन सुध्दा खरेदी केली नाही. ज्या डॉक्टरांची यादी हाॅस्पीटल मध्ये सेवा देत आहे त्यांचे स्वतः चे क्लिनिक आहे व इतर ठिकाणी सेवा देत आहेत. सेवेत असलेल्या डॉक्टरांची यादी सुध्दा बोगस लावल्याचा आरोप त्यांनी लावला. यामध्ये सुध्दा नियम डावलण्यात आले.
23 लेखी मुद्दे त्यांनी माध्यमांसमोर दिले. 28 पानांचे पुरावे त्यांनी यावेळी माध्यमांना दिली. खरोखरच हा घोटाळा असेल तर चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
What's Your Reaction?