कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिपल्या तिस-यांदा स्थानबद्ध

कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टीप्या तिसऱ्यांदा हर्सूल कारागृहात स्थानबद्ध
औरंगाबाद,दि.22(डि-24 न्यूज) गारखेडा परिसरात गुन्हेगारी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेला शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद, वय 29, राहणार विजयनगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद याला तिसऱ्यांदा हर्सूल कारागृहात MPDA कायद्यान्वे स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी दिली आहे.
शेख जावेद उर्फ टिप्या याच्यावर पुंडलिकनगर, जवाहर नगर, मुकुंदवाडी, उस्मानपुरा, क्रांती चौक, सातारा आदी पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी यापूर्वी दोन वेळेस त्याच्यावर स्थानबद्ध करण्याची कारवाई करण्यात आली होती. परंतु शेख जावेद उर्फ टीप्या याच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नव्हती. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, शीलवंत नांदेडकर, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त धनंजय पाटील, उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रणजीत पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे, पोलीस निरीक्षक राजेश यादव, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शेषराव खटाणे सहाय्यक फौजदार द्वारकादास भांगे, जमादार जालिंदर मांटे, डोईफोडे, कल्याण निकम, राजेश यदमल, दिपाली सोनवणे आदींच्या पथकाने शेख जावेद उर्फ टिप्या याच्यावर स्थानबद्ध करण्याची कारवाई केली.
What's Your Reaction?






