पेट्रोल पंप डिलर्सचा आंदोलनाचा इशारा, 7 वर्षांपासून कमिशन वाढ नाही...!
पेट्रोल पंप डिलर्सचा आंदोलनाचा इशारा, 7 वर्षांपासून वाढले नाही कमिशन
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.11(डि-24 न्यूज) गेल्या सात वर्षांपासून पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे कमिशन वाढवण्यात आले नाही. पेट्रोल वर प्रती लीटर तीन रुपये, डिझेलवर प्रती लिटर 1.8 पैसे कमिशन मिळते. सात वर्षांत वाढलेली महागाई, नोकरांचा पगार व इतर खर्च वाढल्याने पंपचालक आर्थिक विवंचनेत आले आहे. इंधनाचे दर अनेकदा वाढले डिलर्सची गुंतवणूक वाढली पण कमिशन वाढले नाही. अनेक पेट्रोल पंप चालकांनी आर्थिक विवंचनेतून पंप विक्रीला काढले आहे म्हणून रखडलेली कमिशन वाढ करावी नसता 15 जूलै ते 15 ऑगस्ट पर्यंत मुक आंदोलन करण्याचा इशारा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अकिल अब्बास, सचिव राजेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. अनेकदा सदस्यांनी मागणी केली तरीही ऑईल मार्केटिंग कंपनी(ओएमसिस) कमिशन वाढ करण्यासाठी निर्णय घेतला नाही यामुळे डिलर्स आर्थिक अडचणीत आले आहेत. यावर वाढते ऑप्शनल खर्च व नवीन रिटेल आउटलेट वेगाने दिले जात आहे. ऑईल कंपन्या व सरकारही मागण्यांकडे गंभीरपणे घेत नाही म्हणून एक महीना पेट्रोल पंपावर कर्मचारी काळी फित व टोपी घालून इंधन विक्री करणार आहे. कमिशन वाढीचा निर्णय लवकर घेतला नाही तर नो पर्चेस व विविध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे.
What's Your Reaction?