आरक्षित जागेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी दलाल - राजरत्न आंबेडकर

 0
आरक्षित जागेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी दलाल - राजरत्न आंबेडकर

आरक्षित जागेवर निवडून आलेले समाजाचे काम करत नाही तर ते दलाल- राजरत्न आंबेडकर 

औरंगाबाद, दि.4(डि-24 न्यूज) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात समाजाची बाजू मांडण्यासाठी व उन्नतीसाठी आरक्षित जागेची मांडणी केली. परंतु आरक्षित जागेवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी लोकसभा व विधानसभेत समाजाची बाजू न मांडता पक्षाची बाजू मांडतात ते तर सत्तेचे दलाल आहेत असा हल्लाबोल अखिल भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी केला आहे. हे वक्तव्य त्यांनी एससी आरक्षित जागेवर निवडून आलेले आमदार, खासदारांसाठी केले आहे.

मराठा बौध्द एक्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते पण अंतरवाली सराटी येथील घटनेमुळे हि परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. असे सिध्दार्थ शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर होते पण हि परिषद रद्द करण्यात आल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेनंतर मराठा आरक्षणासाठी बसलेले आंदोलकांची भेट घेण्यासाठी आंबेडकर अंतरवाली सराटी येथे रवाना झाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झालेल्या घटनेचा त्यांनी निषेध केला. त्यांनी सांगितले डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका होती. ज्यांच्याकडे सत्ता आहे ते आरक्षण देत नाही कारण ते संविधानाला मानणारे नाही. संविधान बदलण्याचे वक्तव्य भाषा पंतप्रधानाचे सचिव करत असतील तर याचा अर्थ काय. यामुळे असे आम्हाला वाटते भविष्यात संविधान बदलण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे आरोप पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी केला आहे. देशातील नागरिकांवर मनुस्मृती थोपण्याचा प्रयत्न केला जात आहे. येणारी लोकसभा निवडणूक संविधान विरोधात मनुस्मृती असणार आहे. One Nation one elelection हे संविधान विरोधी आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रश्न वेगवेगळे असतात. केंद्रातील एकाधिकारशाही चालवण्यासाठी हि संकल्पना समोर आणली जात आहे. सर्व विरोधीपक्षांनी याचा देशभर कडाडून विरोध केला पाहिजे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात बौध्द समाज खांद्याला खांदा लावुन आरक्षणाची लढाई लढेन. ईव्हिएम वर सुद्धा त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. प्रगत देश निवडणुकीत याचा वापर करत नाही मग भारतात कशाला ईव्हीएमचा वापर केला जातो. अमेरीकेत बैलेट पेपर वर निवडणूक होते. निकाल येण्यास उशीर लागतो पण निकाल पारदर्शक येतात म्हणून भारतात सुध्दा बैलेट पेपर वर निवडणूक घेण्यासाठी देशात जनजागृती करुन मोठे आंदोलन उभे करावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी जयप्रकाश नारनवरे, सिध्दार्थ शिनगारे, आकाश खरात, सुमेध नारनवरे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow