गुरुंनी दिलेले ज्ञान आयुष्याची शिदोरी असते- डॉ.भागवत कराड

 0
गुरुंनी दिलेले ज्ञान आयुष्याची शिदोरी असते- डॉ.भागवत कराड

गुरुंनी दिलेले ज्ञान 

आयुष्याची शिदोरी असते- डॉ.भागवत कर

 124 शिक्षकांचा सन्मान पुरस्कार...

औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) भारतीय संस्कृती मध्ये गुरुंना मोठे महत्व आहे. समाजात कसे वागावे ? याचे ज्ञान गुरुच देतात. शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त होते. शिक्षकांनी दिलेले ज्ञान हे विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची शिदोरी असते. असे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी (ता.तीन) केले.  

छत्रपती संभाजीनगर शिक्षण समितीच्या वतीने आयोजित शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 124 शिक्षकांना "शिक्षक सन्मान पुरस्कार" देऊन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भानुदासराव चव्हाण सभागृह येथे संपन्न झालेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यासाठी विश्व फाउंडेशन शिवपुरीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एम. के. देशमुख, एस. पी. जवळकर, प्रियाराणी पाटील, पंकज भारसाखळे, उत्तम राठोड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

यावेळी डॉ. कराड म्हणाले, शिक्षक हा विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या संपूर्ण आयुष्याला त्याच्या ज्ञान, संयम, प्रेम आणि काळजीने एक चांगला आकार देतो. आपल्या विद्यार्थ्याचे जीवन यशस्वी करण्यासाठी तो प्रत्येक प्रकारे कुशल आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे. डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले म्हणाले, शिक्षक हा तीन पिढ्यावर संस्कार करतो. शिक्षकांचे ऋण कोणाला फेडता आले नाही. शिक्षक सतत परीवर्तनाचे काम करत असतो, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ घडवणाऱ्या शिक्षकांना मात्र न्याय मिळत नाहीत. उच्च पदावर कार्यरत प्रत्येक व्यक्तीच्या पाठीवर एका गुरुचा हात असतो, असे राजीमवाले म्हणाले. तर शिक्षणाधिकारी देशमुख म्हणाले, गुरुजींनी सतत स्वतःमध्ये बदल करण्यासाठी विद्यार्थी राहावे लागते. जिल्ह्यात असे अनेक शिक्षक आहेत, ज्यांच्या कार्याची दखल घेतली जात नाही. म्हणूनच आम्ही जिल्‍ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांची निवड करुन त्यांच्या पुरस्कार देवून गौरवले आहे. प्रसंगी अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमासाठी शिवाजी चव्हाण, रामनाथ पंडुरे, साईनाथ माळे, गणेश पवार, प्रशांत मेरत, मिर्झा सलीम बेग, अनिल घायवट, विजय फरकाडे, कृष्णा मुळीक, विलास जाधव, धर्मा चव्हाण, शाहूराज मुगळे, नवाब नक्शबंदी, रमेश आकडे, सादिक शेख, विजय साबळे, अवद चाऊस, प्रा.दिनेश वंजारे, शिल्पा देशपांडे, बी एल जाधव, दिलीप कुंदे, सुरेश पठाडे, बाळासाहेब जाधव, काकासाहेब जाधव, श्रीराम बोचरे, अतुल घडामोडे, नामदेव सोनवणे आदीं उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow