आमदार सतीश चव्हाण अजित पवार गटात जाहीर प्रवेश, निवडणूक लढण्यासाठी इकडे आले होते का... जनतेच्या मनात प्रश्न

आमदार सतीश चव्हाण यांचा अजित पवार गटात जाहीर प्रवेश, निवडणूक लढण्यासाठी इकडे आले होते का... जनतेच्या मनात प्रश्न
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.18(डि-24 न्यूज) मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पुन्हा घरवापसी करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पुण्यात जाहिर प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. शरद पवार यांची त्यांनी पुन्हा साथ सोडली आहे. गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी शरद पवार यांच्या पक्षात आले होते का असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे युवा नेतृत्व डॉ.मजहर खान हे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. त्यांचे या मतदारसंघात प्राबल्य आहे. सतीश चव्हाण यांच्यामुळे डॉ.मजहर खान यांचे तिकीट कापले गेले होते असा आरोप त्यांच्या प्रवेशानंतर केला आहे.
What's Your Reaction?






