गारखेडा परिसरात मंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते सुखद उद्यानाचे उद्घाटन

 0
गारखेडा परिसरात मंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते सुखद उद्यानाचे उद्घाटन

सुखद सहवास उद्यानाचे उदघाटन मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते संपन्न

 उद्यानाची देखभाल करण्याची जबाबदारी नागरिकांची, शिरसाठ

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि 18(डि-24 न्यूज) महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग मार्फत गारखेडा परिसर येथे सिटी सर्वे नं.53 (पी) मधील पडीक पडलेल्या जागेमधे विकसित करण्यात आलेले 

सुखद सहवास उद्यानाचे उदघाटन आज सायंकाळी 4 वाजता सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी लोकसभा सदस्य श्री रावसाहेब दानवे, माजी उप महापौर श्री राजेंद्र जंजाळ आणि आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. 

याठिकाणी मनपा उद्यान विभागामार्फत अतिशय सुंदर उद्यान तयार करण्यात आले आहे. ज्यामधे ज्येष्ठ नागरिकांकरिता गजिबो, तरुणवर्ग करिता व्यायामासाठी मल्टीपर्पज जिम व लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य, लॉन, कंटेनर लायब्ररी, शोभिवंत झाडे इत्यादी प्रकारच्या सोयीसुविधा आहे.

 यावेळी रणजीत पाटील अतिरिक्त आयुक्त-1, ए. बी. देशमुख शहर अभियंता, अपर्णा थेटे उप आयुक्त, फारुख खान कार्यकारी अभियंता, अमोल कुलकर्णी कार्यकारी अभियंता(यांत्रिकी ), विजय पाटील मुख्य उद्यान अधिकारी, प्रकल्प अभियंता कु.स्वप्नाली माने, गोपिकीशन चांडक व कंत्राटदार मुबारक पठाण व मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि सुखद सहवास सोसायटीचे रहिवासी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री श्री संजय शिरसाठ यांनी उद्यानाचे कामाची प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले की महानगरपालिकावर टीका करणाऱ्यांची यादी खूप लांब आहे पण त्याचे चांगले कामांचे कौतुक करणारे नागरिक कमी आहे. हा उद्यान महापालिकेने इतका सुंदर केला आहे की हा इथले राहिवासीयांसाठी मानाची गोष्ट ठरेल. ते पुढे म्हणालेह की जर नागरिकांनी मनपाचे चांगले कामांची प्रशंसा केली तर अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. उद्यानाची देखभाल यापुढे सोसायटीतील लोकांनी करावी अन्यथा हा सुंदर उद्यान खराब होईल, ते म्हणाले.

यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की पहिल्या क्षणी एक सोसायटी निर्माण करून या उद्यानासाठी एक सुरक्षा रक्षक नेमावे जेणेकरून उद्यान व्यवस्थित राहील. पडीक असलेली जागेचा इतका सुंदर उपयोग केल्याबद्दल त्यांनी मनपा उद्यान विभागाचे कौतुक केले. 

यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त जी श्रीकांत म्हणाले की मनपाने उद्यान विकसित करून दिला आहे पण याला सांभाळण्याची जबाबदारी सोसायटीतील नागरिकांची आहे. या उद्यानात सर्व वयोगटासाठी सोयीसुविधा उपल्बध आहे. जयष्ठ नागरिकांसाठी गझिबो, तरुणांसाठी मल्टिप्रप्स जिम, लहान मुलांसाठी खेळणी तसेच वॉकिंग प्लाझा सारखी सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय सदरील उद्यान लहान व तरुण मुलांना मोबाईल पासून दूर ठेवणास देखील उपयोगी ठरेल ते म्हणाले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर्णा थेटे यांनी केले.

 विजय पाटील यांचे विशेष कौतुक:

या लोकार्पण सोहळा प्रसंगी नव्याने विकसित केलेल्या उद्यान बाबत मा.मंत्री महोदय यांनी मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांचे व उद्यान विभागाचे कर्मचारी यांची भरभरून कौतुक केले तसेच उद्यान सोसायटीच्या नागरिकांसाठी असल्याने त्यांनी उद्यानाचा उपभोग घेऊन सदर उद्यानाची साफसफाई देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आव्हा

न केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow