23 नोव्हेंबर, अंबादास दानवेंनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली....!

23 नोव्हेंबर, अंबादास दानवेंनी पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली....!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीत मतदान व 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी असल्याने विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी एक्स हैंडलवर पोस्ट करत पहाटेच्या शपथविधीची आठवण करून दिली आहे. याच दिवशी महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीचा निकाल लावणार असल्याचे म्हटले व महायुतीवर निशाना साधला.
2019 ला विधानसभा शिवसेना व भाजपाला बहुमत मिळाले होते परंतु काही वादानंतर ते सरकार स्थापन झाले नाही. मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याअगोदर 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी पहाटे शपथविधी उरकल्याने राज्यात खळबळ उडाली होती. म्हणून या पहाटेच्या शपथविधीची दानवेंनी आठवण करून देत सोशलमिडीयावर हा फोटो शेअर करत हा शपथविधी लक्षात ठेवावे बाकी विजय आपलाच असे त्यांनी म्हटले आहे.
What's Your Reaction?






