मनोज जरांगे पाटील व इम्तियाज जलील यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ....!
इम्तियाज जलील यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट... राजकीय वर्तुळात खळबळ, या निवडणुकीत सोबत येतात की काय....
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज) आज विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व राजकीय चर्चा केली असल्याची माहिती मिळाली आहे.
दोन्ही नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा केली. भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितले की आम्ही सामान्य जनतेच्या हितासाठी सोबतही येवू शकतात. काहीही घडू शकते. माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 14 महीन्यांपासून लढा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काय करायचे आहे मी आपली भुमिका स्पष्ट केली आहे. मराठा, मुस्लिम, धनगर व अन्य जातींचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी निवडणुकीत दाखवून द्यायचे आहे. समाजात एकमोट बांधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची हिच वेळ आहे.
इम्तियाज जलील यांनी सांगितले या विधानसभा निवडणुकीत नवीन चेहरे राजकारणात आले पाहिजे. प्रस्थापितांचे तेच तेच चेहरे व घराणेशाहीला दूर ठेवण्यासाठी हि निवडणूक आहे. जरांगे पाटील हे आपल्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत आमच्याही समाजाचे प्रश्न आहे. तेच तेच पक्ष, वडील मंत्री तर मुलगा आमदार हे चित्र बदलण्याची वेळ आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगेंची साथ मिळेल. त्यांनी आमच्या सोबत यावे यासाठी ते समाजाशी चर्चा करून निर्णय घेतात तशाच प्रकारे आमच्या पक्षाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून पुढील भुमिका स्पष्ट करु. राज्यात जातीयवाद व दोन समाजात तेढ निर्माण करुन मते लाटण्यासाठी प्रयत्न केले जातात. सर्व जाती धर्म एकत्र आपले जीवन जगण्यासाठी परिश्रम घेतात त्यांना राजकारणांशी काही देने घेणे नसते. परंतु सध्याचे राजकारण गढुळ होत आहे ते राजकारणात बदलण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सर्व जाती धर्म गुण्यागोविंदाने जगले पाहिजे अशी परिस्थिती बनवण्यासाठी हि निवडणूक आहे अशी माहिती जरांगे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी दिली.
What's Your Reaction?