हरियाणात दलित नेत्यांचा अपमान काँग्रेसला भोवला - बाळासाहेब आंबेडकर
 
                                हरियाणात दलित नेत्यांचा अपमान काँग्रेसला भोवला - बाळासाहेब आंबेडकर
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची सखोल चौकशी करून हत्या कोणी घडवली त्याच्यावर कारवाई करावी, विधानसभा निवडणुकीत आदीवासी व विविध पक्ष संघटनांना सोबत घेऊन करणार आघाडी, डॉ.गफ्फार कादरी कोण ओळखण्यास केला इन्कार...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दलित नेत्यांचा झालेला वारंवार अपमान भोवला. राॅबर्ड वढेरा, चिदंबरम यांचे सुपुत्र व काँग्रेसचे काही नेत्यांविरोधात पटियाला कोर्टात सुरू असलेल्या केसेसची पाच वर्षे फाईल उघडावी नाही म्हणून त्या निवडणुकीत जाणूनबुजून पराभव झाला. दलित नेत्यांचा अपमान सहन झाला नाही म्हणून ती मते भाजपाकडे वळली असा गौप्यस्फोट पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी केला असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
त्यांनी मुंबईत माजीमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या मागे कोण त्याला सखोल चौकशी करून अटक करावी अशी मागणी केली आहे. बाबा सिद्दिकी बिल्डर सुध्दा होते त्यांची कोणासोबत वैयक्तिक मतभेद नव्हते मग त्यांची हत्या कोणी घडवली ते समोर आले पाहिजे. आगामी विधानसभा निवडणुकीत आदीवासींची संघटना एकलव्य, भिल व विविध पक्ष संघटनांना सोबत घेऊन आघाडी बनवत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर सुध्दा टिका केली.
सविस्तर बातमी....
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळींनी
सावध राहावे : ॲड. प्रकाश आंबेडकर
काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू
काँग्रेस आणि भाजप यांच्यातील अंतर्गत संबंध वाढत चालले आहेत. यासाठी फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. कारण काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधील जे नेते आहेत. मग ते सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष खरगे, चिदंबरम, चिदंबरम यांचा मुलगा आणि इतरांच्या कोर्टात केसेस होणार होत्या या केसेस जशा पेंडींग राहाव्यात म्हणून काँग्रेसने आपल्याच पक्षातील सर्व दलित कार्यकर्त्यांचा अपमान करायला सुरुवात केली. शैलजा यांचा काँग्रेसने ज्या प्रमाणे अपमान केला त्याची एक चीड दलित समूहामध्ये निर्माण झाली. त्यांनी काँग्रेसला मतदान करायचे ठरवले होते. त्यातील 50 टक्के पुन्हा पुन्हा भाजप मध्ये गेले आणि हेच भाजपच्या विजयाचे कारण ठरले.
काँग्रेस आणि भाजप यांची जी साथ गाठ आहे ती हरियाणाच्या निवडणुकीतून स्पष्ट होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा काँग्रेस, भाजप हे एकाच बाजूला आहेत. म्हणून हरियाणामधील दलितांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. काँग्रेस आता बेभरवशाची झाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही दलित, आदिवासी आणि ओबीसी यांची मूठ बांधत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही मूठ बांधण्यात आम्ही 90 टक्के यशस्वी झालो आहोत. या दोन तीन दिवसांत 100 टक्के होईल त्यांनतर आम्ही किती जागा लढवणार हे स्पष्ट होईल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            