जूना मोंढा परिसरात शांतता, अफवांवर विश्वास ठेऊ नये, विवाद करणा-या पाच जणांना अटक - पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत
जूना मोंढा परिसरात शांतता, अफवांवर विश्वास ठेऊ नये, विवाद करणा-या पाच जणांना अटक - पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज) रविवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान सुमीत थोरात यांच्या घरात घूसून 10 ते 15 लोकांनी मारहाण केली होती. असा फोन पोलिस कंट्रोल रुमला येताच पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तथा कुमक घेऊन तेथे दाखल झालो. परिस्थिती जाणून घेतली तर माहिती अशी आहे काही लोक रस्त्यावर नशापानी करत रस्त्यावर केक कापून धिंगाणा घालतात यामुळे येथील नागरिकांना त्रास होता. त्यांना जाब विचारल्याने विवाद निर्माण झाला. हा विवाद दोन समाजात भांडणाचा नाही. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आठ आरोपींपैकी पाच जणांना अटक केली आहे. आणखी आरोपिंचा शोध घेतला जात आहे. परिसरात शांतता आहे. शहरात अफवा पसरवू नका. अफवा पसरवणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहे ते करु नका नसता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. काही लोकांनी येथे तणाव असल्याचे स्टेटस ठेवले आहे ते काढून टाकावे असे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आहे व शांतता आहे. अशी माहिती डि-24 न्यूजला पोलिस उपायुक्त नवनीत काॅवत यांनी दिली आहे.
What's Your Reaction?