10 डिसेंबर रोजी सकल हिंदू जनजागरण मोर्चा धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर...!

10 डिसेंबर रोजी सकल हिंदू जनजागरण मोर्चा धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर...!
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.7(डि-24 न्यूज)
बांगलादेशी लोकांकडून हिंदू समजावार सुरू असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर देशभर विविध ठिकाणी आंदोलनं करून हे अन्याय अत्याचार थांबावेत व तेथील हिंदू अल्पसंख्यांक बांधवांना न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश या देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकार, मालमत्ता आणि जीवांचे हनन झाल्याचे विविध प्रसार माध्यमांमधून निदर्शनास येते. बांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये हिंदू मंदिरांवर झालेले हल्ले, तोडफोड त्याचबरोबर हिंदू आबालवृद्ध आणि महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यात सातत्याने होत असलेली वाढ ही गंभीर बाब असून अशाप्रकारच्या सर्व मानवाधिकारांचे हनन करणा-या वृत्तींना रोखण्यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही व्हावी व अशा कार्यवाहीस भारताचे हिंदु बांगला देशातील हिंदू बांधवाच्या सोबत आहेत, हेच प्रस्तुत निवेदनाद्वारे सकल हिंदू जनजागरण समितीने नजरेस आणले आहे. अशाप्रकारे केलेल्या असहिष्णू आणि अमानवीय अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदू समूदाय हा त्रस्त आणि व्यथित असून जगभरातील हिंदू समूदाय याची दखल घेत आहे. बांगलादेशात झालेल्या ह्या धार्मिक अत्याचारांमुळे बांगलादेशातील हिंदूंचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि ह्या घटनांमूळे विभिन्न धर्मियांचे सहजीवन धोक्यात आल्याचे आणि बांगलादेश शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते. दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी इस्कॉन ISKCON (International Society for Krishna Consciousness) च्या संबंधीत चिन्मय कृष्ण महाराज यांना खोटया गुन्ह्यात अडकवून जबदरस्तीने आणि हिंसात्मक पध्दतीने केलेली अटक ही निंदनीय आणि कुठल्याही शासनास अशोभनीय आहे. सदरील अटकेनंतर बांगलादेशातील हिंदू समाजाने लोकशाही पध्दतीने केलेल्या आंदोलनास हिंसात्मक पध्दतीने आणि अत्याचाराने चिरडण्यात आले. याचबरोबर असेही लक्षात आले आहे की, चिन्मय कृष्ण महाराजांना चित्तागोंग मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे, जिथे त्यांना योग्य तो औषधोपचार आणि शाकाहारी भोजन मिळण्यास जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करण्यात येत आहेत. हया बाबी जागतिक स्तरावर मान्य अशा मानवाधिकारांचे उल्लंघन करणा-या आहेत. चिन्मय कृष्ण महाराजांना ज्या कारागृहात ठेवण्यात आलेले आहे त्याच कारागृहात विविध कट्टर मुस्लिम दहशतवादी संघटना आणि इतर अशाच कट्टरपंथीय आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित अतिरेक्यांना ठेवल्याचे समजते. ही बाब अतिशय गंभीर असून चिन्मय कृष्ण महाराजांच्या जिवीतास धोका निर्माण करणारी आहे आणि अशाप्रकारचे कृत्य दंडनिय अपराधा सोबत आंतराष्ट्रीय गुन्हा आहे. यातून बांगलादेश शासनाच्या हेतूवर शंका निर्माण होते. ह्या अटके नंतर चिन्मय कृष्ण महाराजांच्या इतर दोन सहका-यांनाही अटक केल्याचे आणि शेकडो हिंदू धर्माचार्यांना भारतात येण्यापासून मज्जाव केल्याचे लक्षात येते. अशाप्रकारे शासन स्तरावरून आणि बांगलादेशात असलेल्या बहूसंख्य मुस्लिम कट्टरपंथीयांकडून होत असलेले हिंदूंचे धार्मिक उत्पीडन जगासमोर आलेले आहे. हिंदूंच्या धार्मिक स्थळ आणि मंदिरांचे संरक्षण बांगलादेशात स्थित हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचे आणि मंदिरांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने कठोर शब्दांमध्ये बांगलादेश सरकारला आपल्या भावना कळवून तात्काळ योग्य ती पावले उचलण्यास आग्रह करावा. आशा प्रकारची भावना सकल हिंदू समाजात आहे. हिंदू धर्माचार्यांची सूटका इस्कॉनचे चिन्मय कृष्ण महाराज आणि त्यांचे सहकारी तसेच, इतर हिंदू धर्माचार्यांची केलेल्या बेकायदेशीर अटकेतून तात्काळ सूटका व्हावी अशाप्रकारच्या सूचना भारत सरकारने बांगलादेशातील अंतरिम शासनास कराव्या. हिंदू महिलांवर होणा-या अत्याचारांना प्रतिबंध बांगलादेशात झालेल्या सत्तांतरावेळी आणि त्यानंतर गेल्या कित्येक महिन्यांमध्ये विविध समाजमाध्यमांमधून बांगलादेशातील हिंदू मुली व महिलांवर झालेले अमानवीय अत्याचार आणि त्यांच्या मानवाधिकारांचे हनन समोर आलेले सदरील अमानवीय अत्याचार आणि मानवाधिकारांचे उल्लंघन तात्काळ थांबवण्यासाठी भार सरकारने जागतिक स्तरावर ह्यासंबंधी आपले मत जाहीरपणाने प्रदर्शित करावे व अंतरराष्ट्रीय समुदायास याबाबत अवगत करावे, ह्यासाठी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) शहरात देखील सकल हिंदू जनजागरण समितीने देवगिरी बँकेच्या प्रशिक्षण केंद्रात आज बांगलादेश हिंदू न्याय यात्रा ह्या विषयावर पत्रकार परिषद आयोजित केली होती.
जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी, सकाळी सकल हिंदू जनजागरण समिती बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढणार आहे व . आपल्या वस्ती उपवस्ती किंवा निवासा जवळील एखादे स्थान निश्चित करून एकत्रित जमायचे आहे व तिथून मोर्चा स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सकाळीं 10 वाजेपर्यंत यायचे आहे. असे आवाहन हिंदू समाजाला करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समस्त हिंदू समाज एकत्रित येऊन निषेध व्यक्त करणार आहेत व निवेदनही देणार आहेत.
या न्याय यात्रेमध्ये जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे असेही आवाहन पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आले.
या पत्रकार परिषदेसाठी मा. श्री. सुदर्शनजी कपाटे महाराज, श्री. विनोदजी बगडिया, श्री. सुशीलजी भारूका यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सकल हिंदू जनजागरण समितीचे चेतन पगारे, विवेक बाप्ते , संदीप जोशी, डॉक्टर रमेश लढ्ढा, कुणाल जाधव यांच्या सह अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते.
What's Your Reaction?






