जम्मू-कश्मिर मधील शहीद जवानांना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली

 0
जम्मू-कश्मिर मधील शहीद जवानांना शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली

जम्मू-काश्मीर मधील शहीद जवानांना शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने श्रद्धांजली

शिवसेना नेते खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती

औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) जम्मू कश्मीर मधील अनंतनाग येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भारतीय लष्कराच्या जवानांना शिवसेना शाखेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. 

याप्रसंगी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड व मा. महापौर नंदकुमार घोडेले, सचिव अशोक पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या मताप्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकी अगोदर पुलवामा येथे झालेला हल्ला नियोजित होता. तत्कालीन केंद्र सरकारला या घटनेतून निवडणुक जिंकण्याचा स्वार्थ साध्य करायचा होता म्हणून सदरील घटना घडवू दिली असा आरोप यावेळी संजय राऊत यांनी केला.

भारत मातेच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या प्रत्येक जवानांची शिवसेना आदरपूर्वक स्मरण ठेवते अशी भावना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावेळी प्रकट केली.

देशाच्या सिमेच्या रक्षणासाठी भारतीय जवान कसल्याही अडचणीची परवा न करता लढत असतात. देशाच्या सीमेवर भारतीय लष्करातील जवान व शेताच्या बांधावर शेतकरी आत्महत्या करत आहे. केंद्र व राज्य सरकारला या दोन्ही निस्वार्थ भावनेने देशासाठी काम करत असलेल्या लोकांशी कसलीही सहानुभूती नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.  

यावेळी गणेश महासंघाचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, बाप्पा दळवी, आनंद तांदुळवाडीकर, अनिल पोलकर, जयवंत ओक, राजू राठोड, अशोक शिंदे, कृष्णा डोणगावकर, विनायक पांडे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक राजू वैद्य, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उपशहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे ,प्रमोद ठेंगडे, अनिल जयस्वाल, संतोष खेंडके, जयसिंग होलीये, प्रकाश कमलानी, राजेंद्र दानवे, शिवा लुंगारे, नितीन पवार, संदेश कवडे, संजय हरणे, रतन साबळे, दिग्विजय शेरखाने, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव, माजी नगरसेवक मनोज गांगवे, सुभाष शेजवळ, कमलाकर जगताप, गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, सचिन तायडे, प्रभाकर मते, दत्ता पवार, सुरेश गायके, प्रवीण शिंदे, बापू कवळे, लक्ष्मण बताडे, भानुदास ससे, वैजनाथ मस्के, बाबासाहेब आगळे, बाबू वाकीकर, रितेश जयस्वाल, गौरव पुरंदरे, प्रवीण शिंदे,सतीश कटकटे, नंदू लबडे, समीर कुरेशी, कैलास राठोड, गणेश लोखंडे, अंकुश वैद्य, संजय पेरकर, सचिन सुलताने, सुखराज हिवराळे, प्रभात पुरवार, चंद्रकांत देवराज, लखन सलामपुरे, गोरख सोनवणे, संतोष बोडखे, प्रतीक अंकुश, युवासेनेचे धर्मराज दानवे, युवती सेनेच्या सानिका देवराज, शिवसेना महिला आघाडीच्या सुनीता देव, सुनिता आऊलवार, दुर्गा भाटी, जयश्री लुंगारे, कला ओझा, विद्या अग्निहोत्री, अशा दातार, नलिनी महाजन, मीराताई देशपांडे, राजश्री पोफळे, सुकन्या भोसले, मंजुषा नागरे, पद्मा तुपे, सीमा गवळी, संगीता पुणेकर, रेखा शहा, सारिका शर्मा, अरुणा भाटी, लता शंकरपाळ, नुसरत शेख, वनमाला पटेल, माजी नगरसेविका मीनाताई गायके, सुनिता सोनवणे, मीना थोरवे ,सुषमा यादगिरे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow