भुमीहिनांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी रस्त्यावर
भुमीहिनांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी रस्त्यावर...
मंत्रीमंडळ बैठकीवर विविध मागणीसाठी काढला मोर्चा...
औरंगाबाद, दि.(डि-24 न्यूज) आज शहरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने भडकलगेट येथे धरणे आंदोलन करत विविध मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिले.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एड डॉ.सुरेश माने यांच्या आदेशानुसार प्रदेश महासचिव अरविंद कांबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
निवेदनात भुमिहिनाचे राहते घर व कसणारी शेती यांचे अतिक्रमण तातडीने नियमाकूल करने, गायरान शासकीय जमिन, वनखाते व इतर अतिक्रमण धारकांना त्याच्या जमिनीचा तात्काळ सातबारा देण्यात यावे. बार्टी पुणे द्वारा राबविण्यात येणाऱ्या लोकोपयोगी कल्याणकारी योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करावी. कन्नड सहकारी साखर कारखान्यातील माजी 967 कर्मचारी यांची दहा वर्षापासून थकीत पगार व ग्रॅज्युटी व इतर देयके तातडीने देवून कर्मचाऱ्यांची अवहेलना थांबवावी. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर यांना वय वर्षे साठ नंतर मासिक 5 हजार रुपये सामाजिक सुरक्षा अनुदान व पेन्शन देण्यात यावी. राज्यातील दलित, अल्पसंख्याक, आदिवासी वरील वाढते अन्याय अत्याचार प्रमाण लक्षात घेता अन्याय अत्याचार ग्रस्त ग्रामपंचायतचे शासकीय अनुदान त्वरित बंद करावे.
महागाई बेरोजगारी तात्काळ बंद करावी. शासकीय नोकरी मध्ये खाजगीकरण थांबवावे. जातीय तेढ, सामाजिक द्वेष पसरविण्याचे काम करणारे मनोहर भिडे गुरुजी वर तातडीने कारवाई करण्यात यावी. ओबीसी जनगननेचा ठराव विधिमंडळात पास करून तातडीने केंद्राकडे पाठवावा. या मागण्या करण्यात आले. यावेळी वकील आघाडीचे एड राहुल जडे, अब्दुल अजिज, एकनाथ बत्तीसे, एड सतीश इंगळे, विकास वाव्हळ, लता सरदार, अनामि मोरे, निर्मला पेटारे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?