शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ.बाळासाहेब थोरात

जिल्हा शिवजयंती महोत्सव समिती 2025 चे अध्यक्षपदी डॉ.बाळासाहेब थोरात यांची निवड जाहीर !
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.1(डि-24 न्यूज) जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची एक व्यापक बैठक या समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार यांचे अध्यक्षते खाली शनिवार 1 फेब्रुवारी 2025 रोजी सिडको भागात पार पडली त्यावेळी सर्वानुमते जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष पदी डॉ.बाळासाहेब थोरात यांची निवड जाहीर करण्यात आली असुन पुढील व्यापक कार्यकारिणी घोषीत करण्याचे अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी बोलतांना या समितीचे संस्थापक पृथ्वीराज भाऊ पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नावघेतल्या नंतर वीरश्री संचार करणार नाही असे होणे नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतीनी अधिराज्य गाजवले आहे. अशा छत्रपती शिवरायांना कधीच विसरता येणार नाही. त्याकाळी आपल्या शहारातील परिस्थिती अंत्यंत प्रतिकुल होती. अशा प्रतिकुल परिस्थिती मध्ये सामाजीक व जातीय सलोखा कायम रहावा यासाठी पुढाकार घेतसर्वधर्मीय, सर्वपक्षीय अशी शिवजयंती महोत्सव समिती बनवुन शहरा मध्ये शांतता निर्माण केली. या वर्षीचे हे 56 वे वर्ष असुन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या पारंपरिक पद्धतीने प्रत्येक पक्षाला अध्यक्षपदाचा मान देण्यात येत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
डॉ.बाळासाहेब थोरात यांचे नांव अध्यक्षपदा करीता माजी अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सुचवले केले तर त्यास माजी अध्यक्ष अभिजीत देशमुख यांनी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिले. वर्ष 2024 चा कार्य अहवाल मावळते अध्यक्ष अनिल बोरसे यांनी बैठकीत सादर केला व त्यांनी नमुद केले की, माझेवर अध्यक्ष पदाची जवाबदारी देउन मला सर्वच शिवभक्त,विविध पक्षांचे मान्यवर नेते,जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन यांनी प्रचंड मोठे सहकार्य केल्या मुळे हे कार्य पार पाडता आले म्हणून मी सर्वांचे शत:श आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व प्रास्ताविक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी करतांना शिवजयंती महोत्सव समितीचे ध्येय धोरणे व ऐतिहासिक व्यापक बाबी उपस्थित समोर विशद केल्या.
कार्यक्रमाचे आभार डी एन पाटील यांनी व्यक्त केले. या व्यापक बैठकीसाठी संस्थापक अध्यक्ष पुथ्वीराजभाऊ पवार, तनसुख झांबड, पंकज फुलफगर, प्रकाश मुगदीया डी एन पाटील, डॉ.राजेंद्र दाते पाटील, अभिजीत देशमुख, विनोद पाटील, राजेंद्र जंजाळ, विजय औताडे, राजेंद्र दानवे, मनोज पाटील, सिद्धांत शिरसाट, अभिषेक देशमुख, अनिल बोरसे सुमित खांबेकर, विजय वाघचौरे, राजु शिंदे, हर्षवर्धन कराड, किशोर तुळशीबागवाले,प्रमोद नरवडे, अनिकेत पवार, संदीप शेळके, हरिष शिंदे, विशाल दाभाडे, राजु पारगावकर, शिवराज नरवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?






