सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांचे काम बंद आंदोलन...!

 0
सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांचे काम बंद आंदोलन...!

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ वकिलांचे काम बंद आंदोलन... !

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.13(डि-24 न्यूज)- सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला करणारा राकेश तिवारीच्या निषेधार्थ जिल्हा वकील संघ, मराठवाडा लेबर लाॅ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन , इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ लायर्सच्या वतीने आज काम बंद आंदोलन करण्यात आले.  

याबाबत असे की, 

काम बंद आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे पत्र जिल्हा वकील संघाने मुख्य न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद यांना तसेच मराठवाडा लेबर लाॅ प्रॅक्टिशनर्स असोसिएशन , इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ लायर्स ने सदस्य औद्योगिक न्यायालय औरंगाबाद यांना रीतसर दिले होते. आज जिल्हा न्यायालय व कामगार व औद्योगिक न्यायालयाचे कामकाज 100% बंद होते. जिल्हा वकील संघाच्या वरांड्यात निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारीने केलेला हल्ला हा न्याय संस्थेवरील , संविधानावरील हल्ला असून, हल्लेखोरास माफ करू नये, तसे झाल्यास भविष्यात असे हल्ले करण्याची हिम्मत आणखी हल्लेखोरांची वाढेल त्यामुळे ही बाब गंभीर समजून कडक कारवाई करण्यात यावी, बार कौन्सिल ऑफ इंडियाने सदर हल्लेखोराची सनद निलंबित केल्याबद्दलही समाधान व्यक्त करण्यात आले, अशा संयुक्त भावना उपस्थित त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी झालेल्या निषेध सभेत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड .अशोक मुळे व सेक्रेटरी अॅड. योगेश तुपे, सहसेक्रेटरी अॅड. अमोल घोडेगाव, मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे सेक्रेटरी अॅड अभय टाकसाळ, उपाध्यक्ष अॅड अनिल सुरवसे, कोषाध्यक्ष अॅड. राजेश खंडेलवाल, इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ लायर्सचे सेक्रेटरी अॅड. विनोद पवार, अॅड. आनंद चावरे त्याचबरोबर ज्येष्ठविधिज्ञ अॅड. सोमनाथ लड्डा, अॅड. के सी डोंगरे, अॅड. राजेंद्र मुगदिया, अॅड. रामनाथ चोबे, अॅड. जे एस भोवते, अॅड.मनोहर लोखंडे, अॅड. मिलिंद पाटील, अॅड. बाबासाहेब वावळकर, अॅड. सागरदास मोरे, अॅड. प्रविण कांबळे, अॅड. विलास वाघ, अॅड. सतिश सुर्यवंशी, अॅड. सुनिल आमराव, अॅड नवाब पटेल, अॅड खिजर पटेल , अॅड जकी पटेल, अॅड. दत्ता ढोबळे, अॅड. रुपेश बरडे, अॅड. संदीप पाटील, अॅड. एस एम पटेल, अॅड. मधुकर खिल्लारे, अॅड. संजय पगारे, अॅड. रविंद्र शिरसाठ, यांच्या सह मोठ्या संख्येने विधीज्ञ उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow