संविधान दिनानिमित्त भडकलगेट येथून प्रथम जिल्हा पथसंचलन व गणसभेचे आयोजन

संविधान दिनानिमित्त भडकलगेट येथून प्रथम जिल्हा पथसंचलन व गणसभेचे आयोजन
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) 26 नोव्हेंबर 2023, संविधान दिनानिमित्त भडकलगेट येथून प्रथम जिल्हा पथसंचलन व गणसभेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सकाळी 9 वाजता मोठ्या संख्येने संविधान प्रेमींनी उपस्थित राहावे अशी माहिती पत्रकार परिषदेत भारतीय संविधान, सम्मान, सुरक्षा व संवर्धन समितीच्या वतीने एड डि.व्हि.खिल्लारे व प्रा.सुनील वाकेकर यांनी केले आहे.
त्यांनी पुढे सांगितले संविधान कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याने देश स्तरावर समिती बाणवून जनजागृती केली जात आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान वाचवण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.
जिल्हा व शहरातील सर्व संविधान प्रबोधक, समर्थक, अभ्यासक, प्रचारक, विद्यार्थी, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, आजी माजी सैनिक, डिफेन्सचे विद्यार्थी व विचारवंत हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, भडकलगेट येथे एकत्र येतील. आजी माजी सैनिक व डिफेन्स अकॅडमीचे विद्यार्थी पुतळ्याला लष्करी पध्दतीने सलामी देतील. नंतर सहभागी संघटना पुष्पहार अर्पण केले जाईल.
त्यानंतर अर्पण केल्यानंतर संविधान गीत होईल. भारताचे संविधानाचे वाचन होईल. संविधानाचे उद्देशिकेचे वाचन झाल्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे दिशेने पथ संचलन सुरू होईल. या पथ संचलनात प्रथम दर्शनी एक उघडी जीप असेल ज्यात राष्ट्रध्वज उभा केलेला असेल. ध्वजाचे खांबास धरुन एक सेवानिवृत्त सैनिक उभा असेल. जीपच्या पाठीमागे लष्करी बँड पथक असेल.
माजी सैनिक व समता सैनिक दल, डिफेन्स अकॅडमीचे विद्यार्थी नंतर BS4 समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. मार्गात येणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल. क्रांतीचौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संचलनाचे रुपांतर गणसभेत होईल. या गणसभेत भारताच्या संविधानावर मान्यवर वक्ते आपले विचार व्यक्त करतील अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
याप्रसंगी एड विजय वानखेडे, ग.ह.राठोड, एस.एम.मोरे, डॉ.भालचंद्र धनेगावकर, शैलेंद्र मिसाळ, बबन राठोड, अशोक इंगोले, एम.आर.मोरे आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






