शहरात बॅनरबाजी...तर कराडांच्या बॅनरची चर्चा

 0
शहरात बॅनरबाजी...तर कराडांच्या बॅनरची चर्चा

शहरात बैनरबाजी...तर कराडांच्या बॅनरची चर्चा... 

औरंगाबाद, दि.15(डि-24 न्यूज) शनिवारी व रविवारी शहरात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीने सर्व मुख्य रस्त्यावर मंत्री महोदयांचा ताफा, सायरनच्या आवाज सुरू झाला आहे. काही रस्ते वाहतुकीसाठी बंद आहे यामुळे काही रस्त्यावर ट्राफीक जाम होत आहे. शहरात मंत्र्यांच्या स्वागतासाठी बॅनरने शहर सजले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवर्षानिमित्त शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी मंत्रीमंडळाची बैठक आहे त्या रस्त्यावर दुभाजकांवर रंगरंगोटी व झाडे लावण्यात आली. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी होर्डिंग्ज व बैनरबाजी शहरात बघायला मिळत आहे. सतत सकाळपासून पाऊस पडत आहे. काही बॅनर तर विजेच्या खांबावर लावल्याने विजप्रवाहाने जिवितहानीची भीती असून सुद्धा स्वागतासाठी कार्यकर्ते उतावळे झाले आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे नाव असलेल्या बॅनरची शहरात चर्चा आहे. त्यांच्या बॅनरवर शिंदे गटाचे आमदार यांचे फोटो आहेत तर भाजपाच्या एकही आमदारांचे फोटो नाही. म्हणून सर्वांचे नजरा या बॅनरवर जात आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे व त्यांचे सुपुत्रांचे फोटो असलेला बॅनर उद्धवराव पाटील चौक येथे विजेच्या खांबावर लावल्याने विजप्रवाहाने जिवितहानीची शक्यता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow