परभणी येथील घटनेचा भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने निषेध
परभणी येथील घटनेचा भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने निषेध...
संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज) परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोडीचा भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून तोडफोड करणाऱ्या जातीवादी माथेफिरूवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे.
भारतीय दलित कोब्रा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी संघटनेचे विभागीय कार्यालय येथे परभणी येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर एका शिष्टमंडळाने आज बुधवारी दुपारी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले या निवेदनात पुढे म्हटले आहे
मंगळवारी सायंकाळी परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची प्रतिकृतीची जातीयवादी माथेफिरूने तोडफोड केली ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे ज्या संविधानाने दिन दुबळे, दलित, मागासवर्गीय, कष्टकरी, कामगार, मजूर यांना न्याय हक्क मिळून दिले. आर्थिक सामाजिक व राजकीय फायदे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिले हे संविधान कुठल्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे परंतु अलीकडे या संविधानावर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहे. विशेषता भाजप आणि आरएसएस या जातीवादी पक्षाकडूनच संविधानाचा गळा घोटला जात आहे. मंगळवारी परभणीत जी घटना घडली ती जातीय मानसिक विकृतीने ग्रासलेल्या व्यक्तीने केली आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली नाही तर भारतीय दलित कोब्रा संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आलाय. यावेळी अशोक दादा बोर्डे, युवा नेते आनंद बोर्डे, सागर बोर्डे, सतीश कुंटे, संदीप मस्के, मलेका बाजी, जयश्री मुदीराज यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
What's Your Reaction?