मोठी बातमी, जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा अब्दुल सत्तार यांच्याकडे

अखेर पालकमंत्रीपद अब्दुल सत्तार यांच्याकडे, भुमरेंनी दिला राजीनामा...!
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.24(डि-24 न्यूज) छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) जिल्ह्याच्या पालकमंत्री पद कोणाकडे भाजपा व शिवसेनेत रस्सीखेच सुरू होती. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संदिपान भुमारे यांचा राजीनामा आल्यानंतर लगेच अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा दिल्याने चर्चेला विराम मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक येथे आयोजित पत्रकार परिषदेत अब्दुल सत्तार यांनी पालकमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली होती. आज ती पूर्ण झाली. औरंगाबादच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लिम आमदाराकडे पालकमंत्रीपद मिळाले आहे म्हणून त्यांच्यावर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या अब्दुल सत्तार हे मुंबईत आहे. त्यांना पालकमंत्री पद मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
What's Your Reaction?






