मनसेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते, साधन - सुविधा व आस्थापनाच्या वतीने महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकल गेट येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अशोक पवार पाटील जिल्हा संघटक मनसे रस्ते, साधन - सुविधा व आस्थापना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेंद्र वाडेकर मनसे शहर उपाध्यक्ष, मध्य विधानसभा, विभाग अध्यक्ष मनोज भिंगारे व मनसेचे संदिप आराक यांची प्रमुख उपस्थिती होती.
What's Your Reaction?