अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी, उध्दव ठाकरे यांनी केली घोषणा...!

 0
अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी, उध्दव ठाकरे यांनी केली घोषणा...!

अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी...! उध्दव ठाकरे यांनी केली घोषणा...

मुंबई, दि.29(डि-24 न्यूज) - विधानपरिषदेची शिवसेना(उबाठा) पक्षाची उमेदवारी आज मातोश्रीवरुन अखेर जाहीर झाली. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना पुन्हा विधानपरिषदेत जाण्याचा मार्ग उमेदवारी जाहीर झाल्याने मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हि घोषणा आज केली आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे विधानपरिषदेत जातील असा सस्पेन्स होता परंतु आज दानवे यांना उमेदवारी घोषित झाल्याने या चर्चेवर पडदा पडला आहे. अंबादास दानवे सध्या शिवसेनेचे अक्रामक नेते म्हणून समोर आले आहे. पक्ष संघटनेत व विरोधीपक्षनेते असताना त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित करुन सरकारला धारेवर धरले होते हे अवघ्या महाराष्ट्राने बघितले आहे.

उद्या सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीच्या वतीने अंबादास दानवे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती शिवसेना तथा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow